शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 10:54 IST

सीमेवर सतर्क असलेले जवान सातत्याने पाकिस्तान पृरस्कृत दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावला आहे.

ठळक मुद्देनियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरुच आहेतया ठिकाणी आणखी दहशतवादी लपून बसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक अद्याप सुरुच आहे. 

जम्मू-काश्मीर, दि. 30 - सीमेवर सतर्क असलेले जवान सातत्याने पाकिस्तान पृरस्कृत दहशतवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न उधळून लावला आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून सातत्याने कुरापती सुरुच आहेत. पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील चकमकीत सुरक्षा जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. आज सकाळपासूनच दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक सुरु होती. यामध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा डाव उधळून लावत त्यांना यमसदनी पाठवले आहे. या ठिकाणी आणखी दहशतवादी लपून बसले आहेत. दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक अद्याप सुरुच आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील तहाब भागातील एका घरात तळ ठोकून बसले होते. भारतीय लष्कराला माहिती मिळतास त्यांना घेरले. लष्कर आणि दहशतवाद्यांध्ये जोरदार चकमक झाली. यामध्ये दोन्ही दहशदवाद्यांना यमसदनी पाठवण्यात आले. पाकिस्तानकडून मागील काही दिवसांपासून नियंत्रण रेषेचं उल्लघंन आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. भारतीय जवान पाकच्या या कृत्याला सडेतोड उत्तर देत आहेत. यामध्ये भारतीय जवानही शहीद होत आहेत.

नियंत्रण रेषेवर मागच्या अनेक महिन्यांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरु आहे. शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करणा-या पाकिस्तानला भारतीय लष्कर त्याच भाषेत प्रयुत्तर देत आहे. पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यादेखील भारतीय लष्कराने उद्धवस्त केल्या आहेत. तरीही पाकिस्तान अजून वठणीवर आलेला नाही. सीमेवर दहशतवाद्यांना घुसखोरीसाठी प्रोत्साहन देण्याच्या पाकिस्तानच्या नापाक हरकती सुरुच आहेत.दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणारे तीन दहशतवादी सुरक्षापथकांबरोबर झालेल्या चकमकीत मारले गेले होते.लष्कराला मोठं यशजम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014 मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108, तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचं श्रेय लष्कर, केंद्रीय दलं, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचं आहे.कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मायावर्षी 2 जुलैपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्यानुसार, "सुरक्षा जवानांना खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु करण्याआधी संपुर्ण प्लान तयार केला जातो. तसंच कमीत कमी नुकसान करुन दहशतवाद्यांना कसं ठार करता येईल याकडेही लक्ष दिलं जातं".