शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा, शोध मोहीम सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2020 14:23 IST

Jammu And Kashmir Encounter : भारतीय सुरक्षा दलाला श्रीनगरच्या रामबाग भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती.

ठळक मुद्देहे दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित होते, हे अद्याप कळू शकले नाही.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथील रामबाग भागात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच, या भागात अजूनही काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळते. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे भारतीय सुरक्षा दलाने अद्याप संपूर्ण परिसर घेरला असून या भागात शोध मोहीम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाला श्रीनगरच्या रामबाग भागात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेराव घालण्यास सुरूवात केली असता येथील घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर सुरक्षा दलाने त्यांना चोख प्रतिउत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. 

दरम्यान, दहशतवादी काही तास गोळीबार करत होते. या गोळीबाराच्या आवाजावरून घरात दोनहून अधिक दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हे दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित होते, हे अद्याप कळू शकले नाही. तरीही या भागात अजूनही काही दहशतवादी लपून बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने परिसर घेरला असून शोध मोहीम राबविली जात आहे. याआधी शनिवारी (10 ऑक्टोबर) जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील चिंगम परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

गेल्या आठवड्यात एलओसीवर पाकचा गोळीबारपाकिस्तानी सैनिकांनी गेल्या आठवड्यात कुपवाडा जिल्ह्यांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबारापाठोपाठ तोफगोळ्यांनी केलेल्या माऱ्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले होते. पाकिस्तानने कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम विभागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत गोळीबारासोबत उखळी तोफांचा मारा केला. यात दोन जवान शहीद झाले होते, तर अन्य चार जण जखमी झाले होते. या जखमी जवानांना उपचारासाठी हलविण्यात आले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी