शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 09:23 IST

Jammu Kashmir : शोपियान जिल्ह्यात पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला करण्यात आला.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. रविवारी (30 सप्टेंबर) सकाळी हा हल्ला करण्यात आला. हल्ला करुन दहशतवादी फरार झाले आहेत. दरम्यान, सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत, शोधमोहीम सुरू केली आहे. दहशतवादी परिसरातच लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी जवान परिसरातील प्रत्येक घराची कसून तपासणी करत आहे.   

 

('Surgical Strike' मधील शिलेदार शहीद, तीन दहशतवाद्यांना संपवून वीर जवान धारातिर्थी)

दरम्यान, एकीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान भारताकडे मैत्रीचा हात पुढे करत असताना दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याकडून भारतात दहशतवादी घुसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 250 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी, यासाठी पाकिस्तानी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. गुप्तचर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर 27 लॉन्च पॅड उभारण्यात आले आहेत. यामधून दहशतवादी भारतात घुसू शकतात. धक्कादायक बाब म्हणजे, यातील आठ कॅम्प गेल्या महिन्याभरात उभारले गेले आहेत. पाकिस्तानी लष्कराचा आशीर्वाद असलेल्या दहशतवाद्यांनी लिपा भागात कॅम्पची उभारणी केली आहे. या भागातील कॅम्प भारतीय सैन्यानं दोन वर्षांपूर्वी सर्जिकल स्ट्राईक करुन उद्ध्वस्त केला होता. भारतीय जवानांनी सर्जिकल स्ट्राईकच्या कारवाईवेळी भिंबर गली परिसरातील लॉन्चिंग पॅड्सदेखील उद्ध्वस्त केले होते. मात्र सध्या तरी या भागात दहशतवाद्यांनी लॉन्चिंग पॅड्स उभारलेले नाहीत. भारतीय सैन्यानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला दोन दिवसांनी दोन वर्ष पूर्ण होणार आहेत. इमरान खान पंतप्रधान झाल्यापासून जवळपास 250 दहशतवादी लॉन्चिंग पॅड्सवर डेरेदाखल झाले आहेत. यातील बहुतांश दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीनचे आहेत. गेल्या महिन्याभरात लिपा, चकोठी, बरारकोट, शार्डी, जुरा भागात दहशतवाद्यांनी लॉन्चिंग पॅड्स उभारले आहेत. याशिवाय चनानिया, मंदौकली आणि नौकोटमध्येही लष्कर-ए-तोयबानं कॅम्प उभारले आहेत. याठिकाणी 30 दहशतवादी आहेत.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी