शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

दहशतवादी येतात, डोक्यावर बंदूक ठेवून मागतात अन्न-पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 10:54 IST

काही गावकरी संधी मिळताच सुरक्षा दलांना देतात माहिती; शोधमोहीम सुरूच

सुरेश डुग्गर

जम्मू  : दहशतवादी हिरानगर, मछेडी, रियासी, राजौरी आणि पूंछ भागात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असून, ते येथील लोकांच्या डोक्यावर बंदूक ठेवून राहण्यासाठी घर आणि जेवण मिळवत असल्याचे तपासात समोर आले आहे. हिरानगरच्या सैदा सोहल गावात गेल्या महिन्यात मारल्या गेलेल्या दोन दहशतवाद्यांनीही आधी गावातील काही घरांमध्ये जबरदस्तीने आश्रय घेतला आणि जेवण व पाणी मागितले. गावकऱ्यांनी वेळीच पोलिसांना माहिती दिल्याने सुरक्षा दलांनी त्यांचा खात्मा केला, मात्र, मछेडी येथे दहशतवाद्यांनी हल्ला केलाच. 

प्राप्त माहितीनुसार, सदोता गावातील एका वृद्ध महिलेने सुमारे १८ तरुण दहशतवाद्यांसाठी जेवण बनवले होते. हल्ल्याच्या संशयावरून अटक करण्यात आलेल्या सुमारे २४ जणांची चौकशी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यांनी ३ ते ४ गट केले असून, ते नंतर वेगवेगळ्या भागात गेले आहेत. येथे दहशतवाद्यांनी इतर अनेक घरांमधून जेवण आणि पाणी गोळा करण्याचा प्रयत्न केला, सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केल्याने यात त्यांना यश आले नाही.

अमरनाथ यात्रा सुरळीत

दहशतवादी हल्ल्यांमुळे अमरनाथ यात्रेकरुंमध्ये भीतीची छाया आहे. यावेळी यात्रेतील ८० टक्के सहभागी असे आहेत जे पहिल्यांदाच यात्रेत सहभागी झाले आहेत. दहशतवाद्यांच्या धमक्या आणि बदलत असलेले हवामान यातूनही अमरनाथ यात्रा यंदा सुरळीतपणे सुरू आहे. २९ जूनपासून सुरू झालेली ही यात्रा १९ ऑगस्ट रोजी अमरनाथ गुहेच्या आत बांधलेल्या शिवलिंगाचे मुख्य दर्शन घेऊन संपेल.

जंगलात दहशतवाद्यांचा शोध

लष्कराच्या वाहनावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कठुआ-उधमपूर-डोडा परिसरातील घनदाट जंगलात सुरू असलेली शोधमोहीम गुरुवारी चौथ्या दिवसात वाढविण्यात आली असून, येथे अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. सोमवारी झालेल्या हल्ल्यात लष्कराचे पाच जवान शहीद झाले, तर अनेक जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी ६० जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली जात आहे. त्यांनी दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा संशय आहे.

हल्ल्यामागे २३ दहशतवादी

मछेडीमध्ये हल्ला करणारा २३ दहशतवाद्यांचा गट इतके दिवस कुठे आश्रय घेत होता, याचा शोध तपास अधिकारी घेत आहेत.

या हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी घुसखाेरी करुन भारतात शिरले आहेत.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी