शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 21:09 IST

Jammu-Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

Jammu-Kashmir Terrorist Attack : जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गजवळ लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पाच जवान जखमी झाले आहेत, तर लष्करात कुली म्हणून काम करणाऱ्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. गुलमर्गच्या नागिन भागात नियंत्रण रेषेपासून (एलओसी) 5 किमी अंतरावर ही धक्कादायक घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी घात लावून लष्कराच्या वाहनावर हा हल्ला केला. माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांची क्विक रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचली असून, परिसरात सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. 

मजुरांवरील हल्ले वाढले

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये इतर राज्यातील मजुरांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात आज सकाळी दहशतवाद्यांनी यूपीमधील एका मजुराला गोळ्या घालून जखमी केले. याआधी गेल्या रविवारी गांदरबल जिल्ह्यात एका बांधकाम साइटवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये 6 मजूर आणि एका स्थानिक डॉक्टरचा मृत्यू झाला, तर 18 ऑक्टोबरला शोपियान जिल्ह्यात बिहारमधील एका मजुराची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

गांदरबलमध्ये दहशतवादी हल्ला गांदरबल येथील झेड मोड बोगदा प्रकल्पावर काम करणारे मजूर आणि इतर कर्मचारी संध्याकाळी उशिरा त्यांच्या छावणीत परतले असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता. खोऱ्यातील मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पातील बांधकाम कामगारांवर झालेला हा पहिलाच मोठा हल्ला होता. हा हल्ला अशा भागात झाला आहे, जिथे गेल्या दशकात दहशतवाद्यांची उपस्थिती खूपच कमी आहे. रविवारी रात्री 8.30 वाजता दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. कर्मचारी मेसमध्ये जेवण करत असताना तीन दहशतवादी तेथे पोहोचले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. कोणाला काही समजण्यापूर्वीच दहशतवाद्यांनी पळ काढला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन वाहनेही जळून खाक झाली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला