शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Jammu-Kashmir Target Killing: कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून बँक मॅनेजरची हत्या, SBI नं पुढे केला मदतीचा हात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 22:39 IST

Jammu-Kashmir Target Killing: यासंदर्भात, एसबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत, विजय कुमार यांच्या कुटुंबाला एसबीआय आर्थिक मदतीशिवाय, इतर प्रकारेही मदद करेल, असे म्हटले आहे. 

राजस्थानातील एका बँक मॅनेजरची जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळ्या झाडून हत्या केली. काश्मीर खोऱ्यात 1 मेपासून मुस्लिमेतर सरकारी कर्मचाऱ्याची दहशतवाद्यांकडून झालेली ही तिसरी हत्या आहे. यानंतर, आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) संबंधित मॅनेजरच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे. यासंदर्भात, एसबीआयने एक प्रसिद्धीपत्रक जारी करत, विजय कुमार यांच्या कुटुंबाला एसबीआय आर्थिक मदतीशिवाय, इतर प्रकारेही मदद करेल, असे म्हटले आहे. 

2019 मध्ये जॉईन केली होती बँक -SBI ने म्हटले आहे, की विजय कुमार हे SBI कडून स्पॉन्सर करण्यात येत असलेल्या Ellaqie Dehati Bank (EDB) मध्ये मॅनेजर पदावर कार्यरत होते. दहशतवाद्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते केवळ 29 वर्षांचे होते आणि मार्च 2019 मध्येच ईडीबीमध्ये जॉईन झाले होते. 

याच बरोबर, 'विजय कुमार हे देशातील विविधा भागांतील कर्मचाऱ्यांपैकी एक होते. जे काश्मीर आणि इतरही काही खडतर भागांत, नागरिकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचविण्यासाठी काम करतात. एसबीआय ईडीबीला स्पॉन्सर करते, यामुळे बँक आपल्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि कल्यानासाठी वचनबद्ध आहे. यात काश्मिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामुळे, ईडीबीकडून त्यांच्या कुटुंबाला तत्काळ वित्तीय आणि इतर प्रकारची मदतही केली जाईल,' असे एसबीआयने म्हटले आहे.

1 मे पासून आतापर्यंत 8 'टार्गेट किलिंग' -जम्मू काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचे नाव नाही. जम्मू-काश्मीरमध्ये 1 मे ते 2 जून या कालावधीत 8 जणांना टार्गेट करण्यात आले आहे. खोऱ्यात सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगवरून विरोधक मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. कुलगाममध्ये एका काश्मिरी पंडित  शिक्षिकेच्या हत्येनंतर दोन दिवसांनी दहशतवाद्यांनी विजय कुमारची हत्या केली. यापूर्वी 31 मे रोजी जम्मूमध्ये रजनी बाला (36) यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. कुलगामच्या गोपालपुरा जिल्ह्यातील एका शाळेत त्या शिक्षिका होत्या.

मे महिन्यात दहशतवाद्यांनी 7 टार्गेट किलिंग केल्या. सर्वात आधी 12 मे रोजी दहशतवाद्यांनी राहुल भट्ट नावाच्या काश्मिरी पंडिताची हत्या केली. यानंतर 25 मे रोजी कलाकार अमरीन भट्ट यांचीही हत्या करण्यात आली. याशिवाय तीन ऑफ ड्युटी पोलीसांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली होती. 

टॅग्स :SBIएसबीआयJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादbankबँक