शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

Jammu & Kashmir: ...म्हणून इतिहास घडत असतानाही मोदी लोकसभेत शांत होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 06:13 IST

याआधी महत्त्वाची विधेयकं संमत होत असताना मोदी अनेकदा बाक वाजवताना दिसले आहेत

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरला असलेला विशेष दर्जा रद्द करणारी विधेयके मंगळवारी लोकसभेत संमत होत असल्याचा इतिहास घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाक का वाजवला नाही याचे रहस्य आता उलगडत आहे.सोमवारी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक सात लोकनायक मार्गावर घेण्यात आली. परंतु, मोदी नेहमी जसे सुहास्य वदनाने असतात तसे ते या बैठकीत नव्हते याचे त्यांच्या सहकारी मंत्र्यांनाही काहीसे आश्चर्य वाटले. मोदी जेव्हा मंगळवारी सायंकाळी शेवटच्या तासात लोकसभेत आले तेव्हा ३७० खासदारांनी त्यांचे उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळीही ते ना हसले ना ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त होत असताना त्यात सहभागी झाले.

गृहमंत्री अमित शहा यांना त्यांचे भाषण सुरू असताना वारंवार दाद मिळत होती. तरीही नरेंद्र मोदी यांनी आपण तणावात असल्याचे भाव दर्शवले. मोदी हे नेहमी असतात त्या व्यक्तित्त्वाचे या ऐतिहासिक क्षणाला नव्हते. गेल्या महिन्यात संसदेत अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामण सादर करीत होत्या तेव्हा मोदी यांनी १०० वेळा बाक वाजवला होता. ऐतिहासिक ठरलेले वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक लोकसभेत संमत झाले तेव्हा मोदी हे बाक वाजवत होते. परंतु, जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयके संमत झाली तेव्हा एकदाही त्यांनी बाक वाजवला नाही. मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना त्यांनी मोठा प्रवास पुढे करायचा आहे त्यामुळे कृपा करून मोठा आनंद आताच व्यक्त करू नका, असेही सांगितले नाही. 

सुरक्षेवरील मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) जम्मू आणि काश्मीरशी संबंधित विधेयके पुढे जाऊ दिली केंद्रीय मंत्रिमंडळाने नव्हे. मोदी हे सीसीएसच्या बैठकीनंतर शहा यांच्यासोबत मंत्रिमंडळाच्या खोलीत आले. मंत्रिमंडळाची संमती मागण्यात आली नाही. त्याऐवजी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी मोदी निर्णय जाहीर करीत असताना वारंवार बाके वाजवली.प्रकाशझोत अमित शहांवरपक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितल्यानुसार जम्मू आणि काश्मीरची ही विधेयके याच सत्रात संमत झाली पाहिजेत यावर मोदी ठाम होते.त्यासाठीच त्यांनी अधिवेशन कामकाजाचे पूर्ण १० दिवस वाढवलेही होते. त्याचे श्रेय न घेता मोदी यांनी मंत्रिमंडळातील त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अमित शहा यांना आघाडीवर स्थान मिळेल, अशी व्यवस्था केली.या विधेयकांसंबंधित सगळा प्रकाशझोत शहा यांच्यावरच असावा व आपल्याकडे न यावा म्हणून मोदी यांनी चर्चेत शब्दश: एकदाही हस्तक्षेप केला नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, मोदी यांनी सोमवारी सकाळी आपल्या निवासस्थानी मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत एकही भाष्य करायचे नाही, असे ठरवले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरNarendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370ParliamentसंसदAmit Shahअमित शहा