शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

The Kashmir Files : "खुदा कसम तुम मिट जाओगे...!"; 'द कश्मीर फाइल्स'वर मौलानाचं चिथावणीखोर वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 16:52 IST

मौलाना काही लोकांना संबोधित करताना म्हणाले, 'आम्ही या देशावर 800 वर्षे राज्य केले आहे, यामुळे देवाची शपथ, तुम्‍ही नष्ट व्हाल, आमचं अस्तित्व संपणार नाही.'

राजौरी - काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि हत्या, यावर आधारीत चित्रपट द कश्मीर फाइल्सवरून अद्यापही वाद सुरूच आहे. या चित्रपटाविरोधात जम्मू-काश्मीरमधील एका मशिदीच्या मौलानाने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मौलाना काही लोकांना संबोधित करताना म्हणाले, 'आम्ही या देशावर 800 वर्षे राज्य केले आहे, यामुळे देवाची शपथ, तुम्‍ही नष्ट व्हाल, आमचं अस्तित्व संपणार नाही.'

'कश्मीर फाइल्स' बॅन करावा - मौलाना मशिदीत लोकांना संबोधित करताना मौलाना फारूक म्हणाले, काश्मिरी मुस्लिमांच्या वेदना विसरल्या गेल्या. हजारो मुस्लीम मारले गेले, त्यांच्याबद्दल चर्चा नाही, मात्र आज समाजात फूट पाडण्यासाठी चित्रपट बनवला गेला आहे. मौलाना फारुख म्हणाले, आम्ही या देशावर 800 वर्षे राज्य केले, या लोकांनी 70 वर्षे राज्य केले, आमची ओळख पुसणे शक्य नाही. याच वेळी त्यांनी या चित्रपटावर बंदी आणावी अशी मागणीही केली आहे.

व्हिडिओ व्हायरल होताच मागीतली माफी - सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, मौलाना म्हणत आहेत, हा चित्रपट बंद व्हायला हवा. तुम्ही 70 वर्षांच्या सत्तेत आमची ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहात. देवाची शपथ तुम्ही नष्ट व्हाल. पण कलमा वाचणारे कधीही नष्ट होणार नाहीत. मात्र, या वक्तव्यांनंतर या मौलानाने एक व्हिडिओ जारी करत माफीही मागितली आहे. 

टॅग्स :The Kashmir Filesद काश्मीर फाइल्सJammu Kashmirजम्मू-काश्मीरMuslimमुस्लीमHinduहिंदू