शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर: 'तो' फरार पोलीस अधिकारी दहशतवादी संघटनेत सामील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 18:55 IST

आदिल बशीरचा हिज्बुल मुजाहिद्दीन कमांडरसोबतचा फोटो वायरल

श्रीनगर : आठ हत्यारं घेऊन पलायन केलेल्या जम्मू-काश्मीरमधील पोलीस अधिकारी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये विशेष पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेला आदिल बशीर गेल्या आठवड्यात आठ शस्त्रास्त्रांसह फरार झाला होता. तो शोपिया जिल्ह्याचा रहिवासी आहे. हिज्बुलचा कमांडर जीनत-उल-इस्लामसोबत एके-47 रायफल हातात धरलेल्या आदिल बशीरचा फोटो आज सोशल मीडियावर वायरल झाला. बशीर गेल्या आठवड्यात आमदार एजाज मीर यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात होता. तिथून तो सात रायफल आणि एक पिस्तुल घेऊन फरार झाला. एका व्यक्तीनं आदिल बशीरला पळून जाण्यात मदत केली होती. त्याची ओळख पटल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आदिल बशीर वाछी मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे पीडीपीचे आमदार एजाज अहमद यांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी तैनात होता.त्याचं वय 24 वर्षे असून तो शोपिया जिल्ह्याच्या जैनपोरा भागाचा रहिवासी आहे. या प्रकरणी पोलिसांनी विभागीय चौकशीचे आदेश दिले असून गुन्हा दाखल केला आहे. आदिल बशीर सात एके-27 रायफल आणि एका पिस्तुलासह फरार झाल्यावर आमदार एजाज अहमद यांच्या सुरक्षेत असलेल्या 10 खासगी सुरक्षारक्षकांची चौकशी करण्यात आली.  

टॅग्स :terroristदहशतवादीHizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनJammu Kashmirजम्मू-काश्मीर