शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Jammu And Kashmir : पूंछ सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट; एक जवान शहीद, 7 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 13:16 IST

जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. या ब्लास्टमध्ये एक जवान शहीद झाला असून सात जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देजम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये आयईडी ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे.ब्लास्टमध्ये एक जवान शहीद झाला असून सात जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये बुधवारी (22 मे) आयईडी ब्लास्ट झाल्याची घटना समोर आली आहे. या ब्लास्टमध्ये एक जवान शहीद झाला असून सात जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टर येथे आयईडी ब्लास्ट झाला आहे. मेंढर येथे सीमारेषेजवळ बुधवारी दुपारी स्फोट घडवण्यात आला. या ब्लास्टमध्ये गस्तीवर असलेल्या सुरक्षा दलाच्या पथकातील आठ जवान जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सात जवान जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, काही दहशतवादी या परिसरात लपल्याची माहिती असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. कुलगाममधील गोपालपोरामध्ये रात्री उशिरापासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यात चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा रक्षकांना यश आले आहे. तर, गोपालपोरा परिसरात लपलेल्या आणखी काही दहशतवाद्यांचा शोध सुरक्षा रक्षकांकडून सुरू आहे. 

छत्तीसगडमध्ये आयईडी ब्लास्ट, 2 जवान गंभीर जखमी

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ मंगळवारी आयईडी ब्लास्ट झाला होता. या ब्लास्टमध्ये जिल्हा राखीव दलाचे (DRG) दोन जवान जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (21 मे) छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील गोगुंडाजवळ झालेल्या आयईडी ब्लास्टमध्ये दोन जवान जखमी झाले होते. सुकमाचे सहायक पोलीस अधीक्षक शालभ सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या जवानांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी तातडीने विमानाने रायपूर येथे हलवण्यात आले होते. 

काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमधील कुरखेडा येथून टाटा एस या मालवाहू वाहनाने जवानांचे पथक जात असताना नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये क्यूआरसीच्या 15 जवानांसह 16 जणांचा मृत्यू झाला होता. नक्षलवाद्यांनी आपल्या प्रभाव क्षेत्रात घडवून आणलेला हा काही पहिलाच हल्ला नाही. गेल्या दहा वर्षांमध्ये राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सुरक्षा दलांचे सुमारे 1150 जवान शहीद झाले आहेत, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले आहेत.

छत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या स्फोटामध्ये भाजपचे आमदार व चार पोलीस ठार

छत्तीसगडच्या दंतेवाडामधील जंगलातून भाजपा आमदार भीमा मांडवी यांच्या वाहनांचा ताफा जात असताना नक्षलवाद्यांनी काही दिवसांपूर्वी स्फोट घडवून आणला होता. त्यात आमदार मांडवी व चार पोलिसांचा मृत्यू झाला होता. स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी त्या वाहनांवर गोळीबारही केला होता. आ. मांडवी व भाजपाचे स्थानिक नेते प्रचारासाठी जात असताना नक्षल्यांनी वाहनांपाशी स्फोट घडवून आणला. दंतेवाडा हा भाग बस्तर मतदारसंघात येतो. बस्तर हा भाग नक्षलग्रस्त असल्याने तिथे सीआरपीएफचे 80 हजार जवान तैनात करण्यात आले तसेच ड्रोनचीही मदत घेतली गेली नक्षली हल्ल्याचे वृत्त येताच मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यांनी आ. मांडवी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आ. मांडवी यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असेही म्हटले होते. तर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनीही या प्रकाराचा निषेध केला होता. 

पश्चिम बंगालमधील नक्षलवाडी येथून सुरू झालेला नक्षलवाद आता देशातील 11 राज्यांमधील 90 जिल्ह्यांत फोफावला आहे. सरकार आणि सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हातात घेतली असली तरी नक्षली हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी होत आहे. गेल्या सात वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सुरक्षा दलांच्या होणाऱ्या जीवितहानीमध्ये घट झाली असती तरी छत्तीसगडमधील दंडेवाडा आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी नक्षलवाद्यांनी आपले प्रभावक्षेत्र कायम राखले आहे. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर