काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला उधळला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 01:22 PM2020-02-05T13:22:56+5:302020-02-05T13:55:37+5:30

काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे.

Jammu-Kashmir : One jawan Martyred, two terrorists have been neutralized in in Parim Pora, Srinagar | काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला उधळला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला उधळला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

googlenewsNext

श्नीनगर - काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. श्रीनगरमधील परिम पोरा येथील चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हा हल्ला परतवून लावताना सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे.

आज श्रीनगरमधील परीम पोरा परिसरात दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणला. दरम्यान, दक्ष असलेल्या जवानांही हा हल्ला परतवून लावला. मात्र दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देताना एका जवानाला वीरमरण आले. तर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यत आले. 

Web Title: Jammu-Kashmir : One jawan Martyred, two terrorists have been neutralized in in Parim Pora, Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.