शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा दलाला मोठं यश; हिजबुलचा टॉप दहशतवादी चकमकीत ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2021 16:59 IST

हिजबुल मुजाहिदीनच्या A+ श्रेणीतील दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या हाती मोठे यश लागले आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात बुधवारी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीन(HM) च्या A+ श्रेणीतील एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला यश आले आहे. 

2018 मध्ये शोपियानच्या झैनपोरा येथे अल्पसंख्याक गृहनिर्माण शिबिराचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवर झालेल्या हल्ल्यासह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. त्या हल्ल्यात चार पोलिस शहीद झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14/15 डिसेंबरच्या मध्यरात्री पुलवामाच्या उजरामपथरी गावात दहशतवादी असल्याच्या एका विशिष्ट माहितीवर कारवाई करण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलीस, लष्कराच्या 44 आरआर आणि सीआरपीएफच्या 182 बटालियनने संयुक्त ऑपरेशन करुन परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली.

शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्याची उपस्थिती लक्षात येताच, त्याला आत्मसमर्पण करण्याची वारंवार संधी देण्यात आली. पण, त्याने संयुक्त शोध पधकावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या सैन्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. या चकमकीत प्रतिबंधित दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मारला गेला असून त्याचा मृतदेह चकमकीच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे. फिरोज अहमद दार असे त्याचे नाव असून तो हेफ-श्रीमल शोपियांचा रहिवासी आहे.

फिरोज दारचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग

पोलिसांनी सांगितल्यानुसार, ठार झालेला दहशतवादी A+ श्रेणीचा होता. तो सुरक्षा दल आणि नागरी अत्याचारांसह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या गटांचा भाग होता. तो 2017 पासून सक्रिय होता आणि डिसेंबर 2018 मध्ये झैनपोरा येथे अल्पसंख्याक रक्षकावर झालेल्या हल्ल्यासह अनेक दहशतवादी गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. 

फिरोजकडून दारुगोळा जप्त फिरोज मूळ पंजाबचा रहिवासी असलेल्या बिगर स्थानिक मजूर हंस राजचा मुलगा चरणजीत याच्या हत्येतही सामील होता. ऑक्टोबर 2019 मध्ये शोपियानच्या जैनपोरा भागात एका वाहनात सफरचंदाचे बॉक्स भरत असताना झालेल्या घटनांमध्ये त्याने इतर लोकांनाही जखमी केले होते. याशिवाय तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यासाठी प्रलोभन देण्यातही त्याचा हात होता. त्याच्याकडून गुन्ह्यातील साहित्य, शस्त्रास्त्रे, तीन मॅगझिनसह एक एके रायफलही जप्त करण्यात आली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी