शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

Jammu & Kashmir: ‘मोदी है तो सब मुमकिन है’; राजकीय प्रतिमा उजळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 02:42 IST

जनतेचा विश्वास ठरविला सार्थ

- संतोष ठाकूर/एस. के. गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरबाबत घेतलेल्या मोठ्या निर्णयाने पुन्हा एकदा आपली राजकीय प्रतिमा मजबूत केली आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’हा नारा भाजप देत आलेला आहे, तो विश्वास मोदी यांनी सार्थ ठरविला.असे मानले जाते की, मोदी यांची राजकीय प्रतिमा उजळून निघाली असून विरोधकांच्या तुलनेत ते अधिक विश्वसनीय झाले आहेत. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी जे निर्णय घेतात त्यांना राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्र प्रेम आणि राष्ट्रीय भावनेशी जोडले जाते. त्यामुळे त्यांचे विरोधकही त्यांच्यासमोर असहाय होतात.पंतप्रधान मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी काळ्या पैशांवर प्रहार, तीन तलाकविरुद्ध कायदा आणण्यासोबतच कलम ३७० समाप्त करण्याची घोषणा केली होती. याशिवाय त्यांनी सर्वांना घर देणे, जीएसटीची अंमलबजावणी यासारखे आश्वासनेही दिली होती. मोदी यांनी एकानंतर एक अशा आश्वासनांवर अंमलबजावणी सुरु केली.मोदी यांनी काळ्या पैशांवर प्रहार करण्याची घोषणा करताना देशात नोटाबंदी केली. लोकांना याचा त्रास झाला. पण, राष्ट्रीय भावनेपुढे याला विरोध करणारे राजकीय पक्ष आणि लोक वेगळे पडले. तसेच, राष्ट्रीय भावनेचा मुद्दा उपस्थित करत देशात जीएसटी लागू केला. यावेळीही याला विरोध करणारे हे देशप्रेमापुढे फिके पडले. त्यानंतर मोदी यांनी तीन तलाकचा मुद्दा उपस्थित करुन देशातील महिलांच्या अस्मितेचा हा प्रश्न असल्याचे सांगितले. यावरही लोकांचे समर्थन मिळविण्यात ते यशस्वी झाले.कलम ३७० हटविल्याने मोदी यांची राजकीय प्रतिमा उजळली आहे. या निर्णयापुढे विरोधक स्वत:ला असहाय समजू लागले आहेत. कारण, बसपा, आम आदमी पार्टी, वायएसआर काँग्रेस, टीडीपीने या निर्णयाचे समर्थन केले असून पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीर