शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir: लष्करचा मोठा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात; एकेकाळी होता भाजपचा आयटी सेल प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2022 19:44 IST

अटक केलेला दहशतवादी एकेकाळी जम्मूमधील भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा सोशल मीडिया प्रभारी होता.

श्रीनगर: जम्मू पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी लष्करच्या एका मोठ्या दहशतवाद्याला अटक केली आहे. तालिब हुसैन शाह असे अटक केलेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. अटक केलेला दहशतवादी एकेकाळी जम्मूमधील भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचा सोशल मीडिया प्रभारी होता. रविवारी सकाळी तालिब हुसेन शाह आणि त्याच्या साथीदारांना रियासी परिसरात ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडून दोन एके 47 रायफल, अनेक ग्रेनेड आणि इतर अनेक शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात गोळ्या सापडल्या आहेत.

पक्ष नेतृत्वाला मारण्याचा कटयाबाबत भाजपचे प्रवक्ते आरएस पठानिया म्हणाले की, हे ऑनलाइन सदस्यत्व घेतल्यामुळे झाले आहे. ऑनलाइन सदस्यत्व घेताना पार्श्वभूमी तपासली जात नाही. या दहशतवाद्याच्या अटकेनंतर हा मोठा मुद्दा समोर आला आहे. मी म्हणेन की हे एक नवीन मॉडेल आहे, ज्याच्या अंतर्गत कोणीही भाजपमध्ये प्रवेश करतो आणि पक्षाची रेकी करतो. अशा प्रकारे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला मारण्याचा दहशतवादी कट रचला जात आहे. मात्र, कोणतीही मोठी घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना अटक केली, ही दिलासादायक बाब आहे.

ऑनलाइनमुळे भाजपात आलाते पुढे म्हणाले की, सीमेवर अनेक लोक दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या ऑनलाइन सदस्यत्वामुळे आता कोणीही भाजपचा सदस्य होऊ शकतो. या प्रक्रियेचा सर्वात मोठा दोष म्हणजे सदस्यत्व घेण्यापूर्वी तुम्ही कोणाचीही पार्श्वभूमी तपासू शकत नाही. तसेच त्याचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले जात नाही. या वर्षी 9 मे रोजी भाजपने अटक केलेला दहशतवादी शाह याला जम्मू क्षेत्राचा आयटी आणि सोशल मीडिया प्रमुख बनवले होते. 

भाजप नेत्यांसोबत फोटोयानंतर दहशतवादी तालिब हुसैन शाहचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबतचे अनेक फोटोही समोर आले होते. जम्मू-काश्मीर भाजप अध्यक्ष रवींद्र रैना यांच्यासोबत तालिब हुसैन शाह याचे अनेक फोटो आहेत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि पोलिस प्रमुखांनी दहशतवाद्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देणाऱ्या गावकऱ्यांना बक्षीस जाहीर केले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांचे एडीजी मुकेश सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटले की, मी गावकऱ्यांच्या धाडसाचे कौतुक करतो आणि त्या गावकऱ्यांना दोन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करतो.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीLashkar-e-taibaलष्कर-ए-तोयबा