शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir: चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार तर दोन जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 09:54 IST

मागील दोन-तीन महिन्यांपासून दहशतवादी या परिसरात लपल्याची माहिती आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir) मध्ये भारतीय लष्कराला मोठं यश मिळालं आहे. शनिवारी भारतीय सैन्याने लष्कर-ए-तैयबाचा कमांडर उमर मुश्ताक खांडे याला ठार केलं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या सात जवानांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुंछ आणि राजौरी जिल्ह्यातील जंगल भागात शोधमोहीम राबवली जात आहे. ही शोध मोहीम रविवारी सातव्या दिवशीही सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याच्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरसह (JOC) दोन सैनिक शहीद झाले. या दोन जवानांच्या मृत्यूसह पुंछच्या सुरणकोटे जंगलात सोमवारी सुरू झालेल्या कारवाईत आतापर्यंत नऊ सैनिक शहीद झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार गुरुवारी ज्या ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक झाली त्या ठिकाणाजवळ मेंढरच्या नर खास वन परिसरात एक जेसीओ आणि जवानाचे मृतदेह सापडले.

दोन महिन्यांपासून दहशतवादी लपले होतेअधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आलीय. दहशतवाद्यांनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला आहे. राजौरी-पूंछ रेंजचे उपमहानिरीक्षक विवेक गुप्ता यांनी मंगळवारी सांगितले होते की, पूंछमधील सुरक्षा दलांवर हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या परिसरात उपस्थित होते. जम्मू प्रदेशातील राजौरी आणि पुंछ भागात यावर्षी जूनपासून घुसखोरीचे प्रयत्न वाढले आहेत.

दहशतवाद्यांनी दोन लोकांना ठार केले

जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये शनिवारी झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दहशतवाद्यांनी दोन स्थानिकांना गोळ्या घालून ठार केलं. पोलिसांनी सांगितले की, बिहारच्या बांका जिल्ह्यातील रहिवासी अरविंद कुमार साह (३० वर्ष) यांची शनिवारी संध्याकाळी श्रीनगरमधील ईदगाहजवळील उद्यानाच्या बाहेर दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. गोळी लागल्याने साहचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी मुळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आणि व्यवसायाने सुतार असलेला सगीर अहमद यालाही गोळ्या घातल्या. अहमदचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी