शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

गुलाम नबी आझाद यांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत; म्हणाले, "आपल्याला समाजात बदल घडवायचाय" 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 15:37 IST

राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य बाबींच्या आधारे चोवीस तास विभाजन करू शकतात. मी आपल्या पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करत नाही, आझाद यांचं वक्तव्य.

Jammu and Kashmir News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहे. रविवारी जम्मू काश्मीरमध्ये बोलताना त्यांनी असे संकेत दिले. आपल्याला समजात बदल घडवायचा असल्याचंही ते यावेळी म्हणाले. "कधी कधी मी विचार करतो, अचानक एका दिवशी तुम्हाला समजेल की मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे आणि समाज सेवा करायला सुरूवात केली आहे," असं त्यांनी नमूद केल.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाचही राज्यांमध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर जी २३ गटाचे मुख्य सदस्य गुलाम नबी आझाद हे सातत्यानं चर्चेत आहेत. यापूर्वी आझाद यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भेट घेतली होती. तसंच त्यांची भेट घेणं ही काही बातमी नसून आपण सातत्यानं त्यांची भेट घेत अल्याचंही ते म्हणाले होते. 

याशिवाय पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतही त्यांनी वक्तव्य केलं होतं. जेव्हा निवडणूक होईल, तेव्हा पक्षाचे कार्यकर्तेच नवा अध्यक्ष कोण हे ठरवतील, असं ते म्हणाले. "राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य बाबींच्या आधारे चोवीस तास विभाजन करू शकतात. मी आपल्या पक्षासह कोणत्याही पक्षाला माफ करत नाही. नागरिकांनी समाजासोबत राहायला हवं," असंही आझाद म्हणाले. आपण सर्व एकत्र राहूनही ते काम करू शकतो. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं काय आपलं काम नाही का? असा सवालही त्यांनी केला.महात्मा गांधींचाही उल्लेखयावेळी बोलताना त्यांनी महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदू आणि धर्मनिरपेक्ष होते यावर आपला विश्वास असल्याचं म्हटलं. तसंच आझाद यांनी काश्मीर फाईल्स चित्रपटावरही भाष्य केलं. "जम्मू-काश्मीरमध्ये जे काही घडले त्याला पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार आहे, त्याचा परिणाम हिंदू, काश्मिरी पंडित, काश्मिरी मुस्लिम, डोग्रा सर्वांवर झाला आहे," असं त्यांनी नमूद केलं. 

टॅग्स :Ghulam Nabi Azadगुलाम नबी आझादJammu Kashmirजम्मू-काश्मीरThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स