शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir : मेहबुबा मुफ्तींना उच्च न्यायालयाचा झटका; पासपोर्ट जारी करण्याची याचिका फेटाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 08:27 IST

CID नं जारी केला मेहबूबा मुफ्तींना पासपोर्ट जारी करण्याच्या विरोधात अहवाल

ठळक मुद्देCID नं जारी केला मेहबूबा मुफ्तींना पासपोर्ट जारी करण्याच्या विरोधात अहवालपरराष्ट्र मंत्रालयाद्वारे निर्धारित उच्च स्तरीय फोरममध्ये अपील करू शकतात, पत्रात करण्यात आलं नमूद

जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयानं सोमवारी माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना झटका दिला. त्यांची पासपोर्ट जारी करण्याची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावली. न्यायालयानं पासपोर्ट अथॉरिटीला पासपोर्ट जारी करण्याचे निर्देश द्यावे, अशी विनंती त्यांनी आपल्या याचिकेद्वारे केली होती. पासपोर्ट तयार करण्याचा मेहबुबा मुफ्ती यांचा अर्ज श्रीनगर पासपोर्ट ऑफिसनं फेटाळला कारण पोलिसांनी पडताळणी अहवाल हा पासपोर्ट जारी करण्याच्या विरोधात दिला होता, असं याचिकेवरील सुनावणीदरम्यान जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अली मोहम्मद मगरे यांनी सांगितलं. "अशा परिस्थितीत माझ्या विचारांनुसार न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांच्या बाजूनं पासपोर्ट जारी करण्याचा आदेश दिला जाऊ शकत नाही. तसंही कोणत्याही व्यक्तीला पासपोर्च जारी करणं किंवा नाही याचं प्रकरण न्यायालयात मर्यादित आहे आणि केवळ संबंधित प्राधिकरणाला सरकारच्या नियमांअंतर्गत कोणत्याही प्रकरणी विचार करण्यास न्यायालय सांगू शकते," असं न्यायाधीशांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे. तथापि, याचिका फेटाळणं, याचिकाकर्त्यांद्वेारे कायद्यांतर्गत अन्य कोणत्याही न्यायिक उपाययोजनांच्या मध्ये एऊ नये असंही न्यायलयानं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, पोलिसांकडून झालेल्या ‘प्रतिकूल पडताळणी अहवाला’च्या आधारे जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचा पासपोर्ट अर्ज प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने फेटाळला आहे.पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांना पाठवण्यात आलेल्या एका पत्रात पासपोर्ट अधिकाऱ्यांनी भारतीय पासपोर्टसाठी मेहबुबा मुफ्ती यांचा अर्ज फेटाळल्याची सूचना दिली आहे. केंद्रशासित प्रदेशाच्या गुन्हे तपास विभागानं (सीआयडी) त्यांना पासपोर्ट जारी करण्याच्या विरोधात अहवाल सादर केला आहे. मेहबूबा मुफ्ती या निर्णयाविरोधात परराष्ट्र मंत्रालयाद्वारे निर्धारित उच्च स्तरीय फोरममध्ये अपील करू शकतात, असंही पत्रात नमूद करण्यात आलं आहे. अर्ज फेटाळल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांनी निशाणा साधत काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाल्याचं चित्र हे दर्शवत असल्याचं म्हटलं.

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu Kashmirजम्मू-काश्मीरHigh Courtउच्च न्यायालयpassportपासपोर्ट