शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन सीजेआय लाडक्या कर्मचाऱ्यांवर मेहेरबान, सहा सहावेळा इन्क्रीमेंट दिली; सर्वोच्च न्यायालयात नेमके चाललेय तरी काय...
2
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
3
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
4
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
5
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
6
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
7
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
8
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
9
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
10
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
11
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
12
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
13
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
14
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
16
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
17
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
18
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
19
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
20
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination : कार्याला सलाम! तबस्सुम शेतात जाऊन राबवतायेत लसीकरण मोहीम, आतापर्यंत 7000 लोकांना टोचली लस  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 19:35 IST

Corona Vaccination : कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी लस हे एक महत्त्वाचे शस्त्र असून जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये या शस्त्राचा चांगला वापर केला जात आहे.

ठळक मुद्देपुलवामा भागातील हेल्थ वर्कर तबस्सुम यांच्या कार्याचे प्रत्येकजण कौतुक करीत आहे.

पुलवामा : देशातील कोरोना व्हायरसची दुसरी लाट हळूहळू कमी होताना दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी विविध राज्यांमधील आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाइन वर्कर्स वेगाने काम करत आहेत. देशातील कोरोना लसीकरण मोहीमेचा वेगही वाढवण्यात आला आहे. कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी लस हे एक महत्त्वाचे शस्त्र असून जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये या शस्त्राचा चांगला वापर केला जात आहे. (jammu kashmir fight against covid-19 tabasum of pulwama vaccinated 7000 residents till now)

पुलवामा भागातील हेल्थ वर्कर तबस्सुम यांच्या कार्याचे प्रत्येकजण कौतुक करीत आहे. अन्नदात्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी तबस्सुम या शेतात जाऊन त्यांना लस देत आहे. तबस्सुम यांनी आतापर्यंत सात हजाराहून अधिक लोकांना लस दिली आहे.  कोरोनास लस टोचण्यासोबतच इतर लोकांनाही लसीचा डोस घ्यावा, यासाठी त्या लोकांना प्रेरित करत आहेत. तबस्सुम यांनी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या लसीकरणावर जास्त भर देत आहेत. शेतात जाणाऱ्या कठीण रस्त्यांची ती पर्वा न करता. तसेच, उन्हाची किंवा पावसाची चिंता न करता त्या सतत लोकांच्या सेवेत गुंतलेल्या दिसून येत आहेत. यासंबंधीचे वृत्त 'आजतक' या हिंदी वेबसाइटने दिले आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कोरोना रुग्णांची संख्या 2 जून रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाचे नवीन 171 रुग्ण आढळले होते, तर 24 तासांत कोरोनामुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, देशातील कोरोना रुग्णांची संख्या आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1,32,364 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर, या कालावधीत 2,713 लोकांचा मृत्यू झाला. परंतु, गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीच्या तुलनेत नवीन प्रकरणे आणि मृत्यूचे आकडे कमी झाले आहेत. गुरुवारी म्हणजेच 3 जून रोजी झालेल्या कोरोनाच्या आकडेवारीनुसार 1,34,154 नवीन प्रकरणे आणि 2,887 मृत्यूची नोंद झाली.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताचा रिकव्हरी रेट वाढलाकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी देशातील कोरोना संक्रमणाच्या स्थितीची माहिती दिली. मंत्रालयाने म्हटले आहे, की गेल्या 8 दिवसांपासून देशात रोज 2 लाखपेक्षा कमी कोरोना रुग्ण समोर येत आहेत. एकूण दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या 68 टक्यांनी घटली आहे. मात्र, 5 राज्यांतून अद्यापही 66 टक्के कोरोना रुग्ण समोर येत आहेत तर उरवरीत 31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून 33 टक्के रुग्ण समोर येत आहेत. तर गेल्या 24 तासांत एकूण 1,32,000 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. कोरोनाच्या ताज्या स्थितीसंदर्भात आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, रिकव्हरी रेटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या रिकव्हरी रेट 93.1 टक्के एवढा आहे. देशातील 377 जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांनी कमी आहे. आरोग्यमंत्रालयाने म्हटले आहे, की सात मेरोजी कोरोना पीकवर पोहोचल्यानंतर, आतापर्यंत कोरोना बाधितांच्या संख्येत 68 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. 10 मेरोजी उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या पीकवर पोहोचल्यानंतर, आतापर्यंत त्यात 21 लाखहून अधिकची घट झाली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याJammu Kashmirजम्मू-काश्मीर