शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

जम्मू काश्मीर : शोपियानमध्ये दहशतवादी हल्ल्यात मेजर आणि एक जवान शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 09:31 IST

जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये गुरुवारी सकाळी भारतीय सैनिकांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मेजरसहीत 2 जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

श्रीनगर, दि. 3 -  जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये गुरुवारी सकाळी भारतीय सैनिकांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मेजरसहीत 2 जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर आणखी एक जवान गंभीर जखमी झाला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 दहशतवाद्यांनी सैन्याच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यानंतर संपूर्ण परिसरात सैन्यानं शोधमोहीम सुरू केली. 

तर दुसरीकडे, कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय सैन्यानं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील गोपालपोरा परिसरात गुरुवारी सकाळी जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. बुधवारी रात्री संशयित दहशतवादी परिसरात शिरल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलीस संयुक्त शोध मोहीम सुरू केली व शोपियान जिल्ह्यातील सुगान गावाला घेराव घातला. 

दरम्यान, मंगळवारी भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात. 

भारतीय लष्कराकडून 114 दहशतवाद्यांचा खात्माअबू दुजानासहीत दहशतवादी आरिफ लिहारी याचाही मंगळवारी जवानांनी खात्मा केला. विशेष म्हणजे आतापर्यंत एकूण 114 दहशतादी ठार झाले असून अबु दुजाना आणि आरिफ लिहारीचा क्रमांक अनुक्रमे 115 आणि 116 वा होता. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, यावर्षी 31 जुलैपर्यंत काश्मीर खो-यात एकूण 114 दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गतवर्षी 31 जुलैपर्यंत हा आकडा 92 होता. म्हणजेच यावर्षी 114 दहशतवादी ठार झाले असताना 2016 मध्ये 92 दहशतवादी ठार झाले होते.

 

विशेष म्हणजे फक्त जुलै महिन्यात जवळपास 22 दहशतवादी ठार झाले आहेत. 2 जुलैपर्यंत एकूण 92 दहशतवादी ठार होते, 31 जुलैपर्यंत हा आकडा 114 वर पोहोचला. 2012 आणि 2013 मधील आकडेवारी पाहता 2017 मधील आकडा खूपच वाढला आहे. 2012 आणि 2013 मध्ये अनुक्रमे 72 आणि 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. त्यावेळी यूपीए सरकार सत्तेत होते. एनडीए सत्तेत आल्यानंतर आकडेवारीमध्ये सतत वाढ होत असल्याचे दिसत आहे. 2014 मध्ये 110, 2015 मध्ये 108 आणि 2016 मध्ये 150 दहशतवादी ठार झाले होते. 'दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी मोकळे हात दिले असून तसेच राजकीय पाठिंबा मिळत असल्याने सुरक्षा जवानांना गतवर्षी असलेला 150 चा आकडा पार करण्यात यश मिळेल', असे गृहमंत्रालयाशी संबंधित एका अधिका-याने सांगितले आहे. 

अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याची आखणी करणारा लष्कर-ए-तैयबाचा काश्मीरमधील प्रमुख अबू दुजाना आणि त्याच्या साथीदाराचा सुरक्षा जवानांनी खात्मा केला. बुरहान वानीला ठार करण्यात आल्यानंतर सुरक्षा जवानांनी केलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. सुरक्षा जवानांना गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात चांगले यश मिळत आहे. सुरक्षा तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा सर्व सरकारच्या नव्या रणनीतीचा परिणाम आहे. ज्यामध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी झीरो टॉलरंस धोरणाची अंमलबजावणी केली जात आहे. 

गृहमंत्रालयाच्या एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार काश्मीरसंबंधी मुख्य तीन गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित करत आहे. दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे, ज्यामध्ये जर का दहशतवादी आत्मसमर्पण करण्यास नकार देत असेल तर त्यांना ठार करण्यात येत आहे. चकमक होत असलेल्या ठिकाणी स्थानिकांकडून निदर्शन होत असलं तरी त्याचा काहीच प्रभाव सुरक्षा जवानांवर होत नाही. सोबतच टेरर फंडिंगशी संबंधित हुर्रियत फुटीरवादी नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय, स्थानिक लोकांसोबत शक्य तितकी नरमाईची भूमिका घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल ज्यामुळे त्यांना आपण पीडित असल्याचं भासू नये. येणा-या दिवसांमध्ये सुरक्षा जवान आपली ही भूमिका कायम ठेवतील असं एका अधिका-याने सांगितलं आहे. 

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे दहशतवाद्यांवरील दबाव अजून वाढेल. याशिवाय अन्य मोठे दहशतवादी ज्यामध्ये अबू इस्माईल आणि हिजबूल, अलकायदाशी संबंधित झाकीर मूसा यांचा समावेश आहे, त्यांना ठार करण्यासाठी लष्कराकडे प्लान तयार आहे. जम्मू काश्मीर पोलिसांच्या स्थानिक सूत्रांकडून मिळणारी माहिती आणि सुरक्षा जवानांमध्ये होणारा योग्य सुसंवाद यामुळे दहशतवाद्यांना नेस्तनाभूत करण्यात यश मिळेल असा विश्वास सरकारला आहे.