शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 19:22 IST

Jammu-Kashmir Encounter:या भागात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे.

Jammu-Kashmir Encounter: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील दाछान भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांचा एक गट या भागात लपून बसल्याचा संशय आहे. माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी या परिसराला वेढा घातला असून, शोध मोहीम सुरू आहे. 

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुप्त माहितीच्या आधारे दाछान आणि नागसेनी दरम्यान असलेल्या खानकू जंगलात पोलिस आणि सैन्याने शोध मोहीम सुरू केली, तेव्हा ही चकमक सुरू झाली. शोध मोहीम सुरू होताच जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना पाहताच गोळीबार सुरू केला.

प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनीही कारवाई केली आणि गोळीबार केला. ही चकमक काही काळ चालली, मात्र यात कोणीही जखमी किंवा मृत झाल्याचे वृत्त नाही. अधिकाऱ्यांच्या मते, या भागात अतिरिक्त सुरक्षा दल पाठवण्यात आले आहे आणि कारवाई अजूनही सुरूच आहे. सुरक्षा दल जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांना घेराव घालून त्यांना पकडण्याचा किंवा निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सुरक्षा दलांची कडक कारवाई

किश्तवाडमधील चकमकीच्या घटनेच्या एक दिवस आधी, शनिवारी, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या काउंटर-इंटेलिजन्स शाखेने दहशतवादी निधी आणि भरती मॉड्यूलशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रकरणात मोठी कारवाई केली आणि श्रीनगर, पुलवामा, बडगाम आणि गंदरबल जिल्ह्यांमधून १० संशयितांना ताब्यात घेतले. या सर्वांवर पाकिस्तानच्या सूचनेनुसार दहशतवादी कारवायांचे समन्वय, वित्तपुरवठा आणि अंमलबजावणी केल्याचा आरोप आहे.

तपासात मोठे खुलासे

तपासात असे दिसून आले की हे सर्व संशयित एका विशेष एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्लिकेशनद्वारे सतत संपर्कात होते. या अॅप्लिकेशनचा वापर दहशतवादी संघटना भरती, निधी आणि हल्ल्यांचे समन्वय साधण्यासाठी करत होत्या. हे संपूर्ण नेटवर्क पाकिस्तानस्थित दहशतवादी हँडलर अब्दुल्लाह गाजी चालवत होता, जो लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या संघटनांशी संबंधित आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवान