शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : कुलगाममध्ये चकमकीदरम्यान एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 10:59 IST

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. कुलगाम चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

ठळक मुद्देकुलगाम चकमकीत एक जवान शहीददोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यशपुलवामातील त्राल परिसरातही लपलेल्या दहशतवाद्याचा शोध सुरू

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. कुलगाम चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश मिळाले आहे. जिल्ह्यातील रेडवानी गावातील एका घरामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानंतर भारतीय लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफनं संयुक्तरित्या ऑपरेशन राबवत परिसरात शोधमोहीम सुरू केली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच तासांमध्ये चकमकीदरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यादरम्यान,  एक जवान शहीद झाला आहे. 

(Jammu Kashmir : ऑपरेशन ऑलआऊट! 72 तासांत 16 दहशतवाद्यांचा खात्मा)

 

याव्यतिरिक्त, पुलवामामधील त्रास परिसरातही दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. हाफू गावात एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी या संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्याचा शोध सुरू आहे. 

 

काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा

दरम्यान, दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शनिवारी (24 नोव्हेंबर) मध्यरात्री सुरू होऊन रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिलेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. संशयित दहशतवादी म्हणून मारल्या गेलेल्या सहांपैकी पाच जण स्थानिक युवक होते. सहावा पाकिस्तानी नागरिक असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लगोलग करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.   

टॅग्स :terroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवान