शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मेहबूबा मुफ्ती यांच्या मुलीची राजकारणात एंट्री; PDP ने जाहीर केली 8 उमेदवारांची पहिली यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 19:52 IST

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या मुलीला विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे.

Jammu-Kashmir Election : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर जम्मू-काश्मीर विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यासाठी आता सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली असून, या यादीत मुलगी इल्तिजा मुफ्ती यांचेही नाव आहे. इल्तिजाची ही पहिलीच निवडणूक असून, तिला दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या बिजबेहारा येथून तिकीट देण्यात आले आहे. 

मेहबुबा यांनी राजकीय वारसा मुलीकडे सोपवला मेहबूबा मुफ्ती यांनी आपला राजकीय वारसा आपल्या मुलीकडे सोपवण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे. मेहबुबा यांनी यंदाची निवडणूक लढवण्यास नकार दिला असून, आता त्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे, इल्तिजा मुफ्ती यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्या बऱ्याच काळापासून पक्षप्रमुखांच्या मीडिया सल्लागार म्हणून काम करत आहेत.

PDP च्या 8 उमेदवारांची नावे जाहीर

  1. अनंतनाग पूर्व - अब्दुल रहमान वीरी
  2. देवसर - सरताज अहमद मदनी
  3. अनंतनाग - डॉ.मेहबूब बेग
  4. चरार-ए-शरीफ - नबी लोन हंजुरा
  5. बिजबेहरा - इल्तिजा मुफ्ती
  6. वाची - जी.मोहिउद्दीन वाणी
  7. पुलवामा - वाहीद-उर-रहमान पारा
  8. त्राल - रफिक अहमद नाईक

पीडीपीचे सरचिटणीस गुलाम नबी लोन हंजुरा यांनी ही यादी जाहीर केली आहे. 

कोण आहे इल्तिजा मुफ्ती?जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती (37) आगामी विधानसभा निवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि युनायटेड किंगडमच्या वारविक विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. तेव्हा इल्तिजा यांना मीडिया सल्लागार म्हणून नेमण्यात आले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूक 2024Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती