Jammu Kashmir Bus Accident: जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये मंगळवारी (6 मे) एक भीषण अपघात झाला. प्रवासी बस खाड्यात कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर 35 जण जखमी झाले. पूंछ जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयाचे बीएमओ डॉ. मोहम्मद अशफाक चौधरी यांनी सांगितले की, सर्व जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पुंछ जिल्ह्यातील घानी गावातून मेंढरकडे जात होती. यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावरुन घसरुन खड्ड्यात पडली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक ग्रामस्थांनी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. काही वेळातच पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले.
या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 35-40 प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये मोहम्मद मजीद आणि नूर हुसेन, यांचा समावेश आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. डॉ. अशफाक चौधरी यांनी सांगितले की, 5 गंभीर जखमींना प्राथमिक उपचारानंतर जम्मूच्या सरकारी मेडिकल कॉलेज (जीएमसी) रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.