शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बारामुल्लामधून हिज्बुल 'ऑल आउट'; काश्मीर खोऱ्यात भारतीय लष्कराची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 12:57 IST

सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम हाती घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केली आहे.

ठळक मुद्देकाश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला जिल्हा दहशतवादमुक्त बारामुल्लामध्ये एकही दहशतवादी नाही - जम्मू काश्मीर डीजीपीचकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर - सीमारेषेपलिकडून वारंवार भ्याड हल्ला करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी भारतीय लष्करानं मोहीम हाती घेतली आहे. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने अधिकच तीव्र केल्याचं दिसत आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत कधी काळी हिज्बुलचा गड मानल्या जाणाऱ्या काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला दहशवादमुक्त केले आहे. दहशतवादाविरोधातील भारतीय लष्कराच्या मोहीमेला मिळालेले हे मोठे यश आहे. 

जवानांच्या यशस्वी कारवाईनंतर बारामुल्ला जिल्हा दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलेल्या उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला हा पहिलाच जिल्हा असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी (23 जानेवारी) बारामुल्लामध्ये तीन दहशवाद्यांना यमसदनी धाडल्यानंतर भारतीय लष्कराकडून या जिल्ह्याला दहशतवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. 

जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार,'बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी राबवण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीमध्ये बारामुल्लामध्ये एकही जिवंत दहशतवादी नाहीय.'भारतीय लष्कराने चकमकीत ठार केलेल्या दहशतवाद्यांकडील तीन एके-47 रायफल्सही जप्त केल्या. या दहशतावाद्यांवर ग्रेनेड हल्ला आणि तीन स्थानिक युवकांच्या हत्येचाही आरोप होता. 

बारामुल्ला जिल्ह्यावर दहशतवादाचा होता प्रभावबारामुल्ला जिल्ह्यावर फार दीर्घ काळापासून दहशतवादाचा प्रभाव होता. बारामुल्लातील सोपोर परिसरात यापूर्वीही कित्येकदा भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी झाल्या आहेत.  ऑपरेशन ऑल आउटदरम्यानही भारतीय लष्कराने  बारामुल्लातील वेगवेगळ्या गावांमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.  

बारामुल्ला हल्ल्यानंतरच सर्जिकल स्ट्राइकची कारवाई 2016 मध्ये बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील लष्करी  तळावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 16 भारतीय जवानांना वीरमरण आले होते. यानंतर भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्टाइकची कारवाई केली होती.   

टॅग्स :Hizbul Mujahideenहिज्बुल मुजाहिद्दीनIndian Armyभारतीय जवानJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी