शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir : शोपियानमध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 09:41 IST

Jammu Kashmir : जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे.

श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील शोपियानमध्ये सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. मोहम्मद इदरीस सुलतान आणि आमिर हुसैन रैदर अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत. या दोघांचाही दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुसाठा जप्त करण्यात आला आहे. 

यापूर्वी शनिवारीदेखील शोपियान जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या परिसरात जवानांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम राबवली होती.  यादरम्यान, हिजबुल मुजाहिदीनचे इरफान अहमद भट व शाहिद अहमद मीर हे दहशतवादी ठार झाले.खुदपोरमध्ये काही दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यामुळे सुरक्षा दलांनी या भागात शनिवारी संध्याकाळी शोधमोहीम हाती घेतली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले व आणखी दोन जण तेथून पळून गेले. भट हा गेल्या वर्षी दहशतवादी कारवायांत सामील होता. मीरवर २००४ सालातील एका शस्त्रचोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दोघांकडून काही शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला. शाहिद मीर हा गागरान गावचा तर भट हा बांडझू गावचा रहिवासी आहे.

(जवानांनी स्नायपर्सला घातले कंठस्नान, दहशतवादी मसूद अझरच्या भाच्याचा खात्मा)सुरक्षा दलाकडून अधिक दक्षताकाश्मीरमध्ये हिवाळ्याच्या आधी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न होतात. हिवाळा सुरू झाला की, हिमवृष्टीमुळे घुसखोरीचे मार्ग नोव्हेंबर ते मे या काळात बंद होतात. घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांच्या घातपाती कारवाया हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दले सज्ज असतात पण हिवाळ्यात तर त्याबाबत अधिक काळजी घेतली जाते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर