शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू काश्मीर : जवानांनी केला लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2017 09:33 IST

श्रीनगर, दि. 7 - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील सम्बुरा येथे सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आणखी दहशतवादी परिसरात लपून बसला आहे. जवानांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू  करण्यात आली आहे. सम्बुरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री 50 राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत ...

श्रीनगर, दि. 7 - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील सम्बुरा येथे सुरक्षा दलानं लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आणखी दहशतवादी परिसरात लपून बसला आहे. जवानांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू  करण्यात आली आहे. 

सम्बुरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री 50 राष्ट्रीय रायफल्स आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होत परिसराला घेराव घातला. यानंतर शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. जवानांनी केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी ठार झाला.  

दरम्यान, गेल्या काही चार दिवसांत आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शनिवारी ( 5 ऑगस्ट ) सकाळी सोपोर जिल्ह्यातील अमरगड येथे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत जवानांनी लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तीन एके-47 जप्त करण्यात आल्या आहेत. 

 

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी ठार

दरम्यान, शुक्रवारी ( 4 ऑगस्ट ) जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा दहशतवादी ठार मारला गेला. स्थानिक पोलिसांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला.  एका पोलीस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील बिजबेहरा परिसरात दहशतवादी शिरल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. यानंतर त्यांनी परिसराला घेराव घातला व शोधमोहीम सुरू केली.  मात्र, रात्री अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि तेथून पसार होण्यात त्यांना यश आले.

यानंतर एन्काऊंटरमध्ये एका बाईकस्वाराला ठार करण्यात आले. ठार करण्यात आलेला व्यक्ती हा हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी होता, असे पोलिसांनी सांगितले. या दहशतवाद्याकडून रायफल,  चिनी हॅण्ड ग्रेनेडसहीत अन्य दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या चकमकीत 3 राष्ट्रीय रायफल्सचे एक जवान जखमी झाला आहे.   दहशतवादी हल्ल्यात जवान शहीदगुरुवारीदेखील ( 3 ऑगस्ट ) जम्मू काश्मीरमधील शोपियान व कुलगाम येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यातील एका दहशतवाद्याचं नाव आकिब असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर शोपियानमध्ये भ्याड दहशतवादी हल्ल्यात एक मेजर व दोन जवान शहीद झाले आहेत.   दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीननं शोपियान हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. यात अल्ताफ खुचरू सामिल होता, असे वृत्त समोर आले आहे. तो टॉप हिजबुल कमांडर असल्याचे बोलले जात आहे. लष्कर-ए-तोयबाच्या अबू दुजानाचा खात्मामंगळवारी ( 1 ऑगस्ट ) भारतीय लष्कराने लष्कर-ए-तोयबाचा टॉपचा कमांडर अबू दुजाना आणि त्याचा साथीदार आरिफचा एन्काऊंटर केला. भारतीय लष्कराचे हे मोठे यश असल्याचे मानले जातात.