शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, जम्मूच्या अरनियामध्ये रात्रभर उखळी तोफांनी हल्ला, आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 09:36 IST

गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून सुरू असलेला गोळीबार पाकिस्तान काही थांबवण्याचं नाव घेत नाहीये.

जम्मू-काश्मीर- गेल्या काही दिवसांपासून सीमेपलीकडून सुरू असलेला गोळीबार पाकिस्तान काही थांबवण्याचं नाव घेत नाहीये. सोमवारी रात्रीही पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरमधल्या अरनिया आणि आरएसपुरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पुन्हा एकदा गोळीबार केला. पाकिस्ताननं अरनिया सेक्टरमध्ये रात्रभर उफळी तोफांचा मारासुद्धा केला. या गोळीबारात आठ महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.  रविवारपासून पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच होता. अरनियातील त्रेवा गावाला पाकिस्तानी रेंजर्सनी लक्ष्य केले. तिथे सलग चौथ्या दिवशी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. काल पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबार थांबवा, अशी गयावया केल्यानंतर बीएसएफने सीमारेषेवर गोळीबार बंद केला होता. पण त्यानंतर काही तासांतच पाकने आपला खरा चेहरा दाखवला व प्रामुख्याने भारतातील नागरी वस्त्या व गावांवर हल्ले सुरू केले. पाकने रविवारी जम्मूतील सांबा सेक्टरच्या बाबा चमिलियाल तसेच नारायणपुरा भागातून जाणा-या आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ गोळीबार केला. सध्या पाककडून उखळी तोफांचा मारा सुरू आहे. त्यामुळे त्याच भाषेत भारतीय जवानही त्यांना उत्तर देत आहेत. त्यात पाकिस्तानचे 4 ते 6 सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. तसेच पाक लष्कराच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.शाळा बंद, लोक घराच्या आतपाकने आपला नापाक चेहरा दाखवत असून, गोळीबार व तोफांचा मारा थांबवायला तयार नाही. त्यामुळे बीएसएफ व स्थानिक पोलिसांनी ग्रामस्थांना घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. शिवाय त्या परिसरातील शाळादेखील बंद ठेवल्या आहेत.

पोलीस चौकीवर हल्लापाकिस्तानच्या कागाळ्या सुरू असतानाच काश्मीर खोºयातील पुलवामा जिल्ह्यात एका पोलीस चौकीवर काही अतिरेक्यांनी सोमवारी हल्ला केला. पोलिसांनी त्यांना लगेच गोळीबाराने उत्तर दिले. अतिरेकी पळून गेले असून, त्यांचा शोध जारी आहे. या हल्ल्यात कसलेही नुकसान झालेले नाही.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानFiringगोळीबार