शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 08:05 IST

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत.घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सुरक्षा दल असे प्रयत्न हाणून पाडत आहे.जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात जवानांना यश आले आहे. 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या आहेत. या ठिकाणाहून घुसखोरीचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र सुरक्षा दल असे प्रयत्न हाणून पाडत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक करण्यात जवानांना यश आले आहे. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन पाकिस्तानी दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याच दरम्यान त्यांना अटक करण्यात यश आले आहे. सध्या या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तसेच  300 ते 350 अतिरेकी काश्मिरात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे गुप्तचर एजन्सी आणि सुरक्षा दलाने म्हटले आहे. तर गेल्या दोन आठवड्यांत 40 ते 50 अतिरेकी घुसखोरी करण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

काश्मीरमध्ये आठ महिन्यांत 139 दहशतवाद्यांचा खात्मा

यंदाच्या वर्षी 1 जानेवारीपासून ते 29 ऑगस्टपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने 139 दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती लष्कराच्या सूत्रांनी दिली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षात तसेच काश्मीरमध्ये विविध ठिकाणी झालेल्या चकमकीत हे दहशतवादी ठार झाले आहेत.

गेल्या आठ महिन्यांच्या कालावधीत दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत 26 जवान शहीद झाले. त्यातील सर्वाधिक मृत्यू फेब्रुवारीत झाले. त्या महिन्यात आठ जवान शहीद झाले होते. एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, ऑगस्ट महिन्यात झालेल्या चकमकीत पाच दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले तर एकाला जिवंत पकडण्यात आले. मे महिन्यामध्ये लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत 27 दहशतवादी ठार झाले. यंदाच्या अन्य महिन्यांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने दहशतवाद्यांचा खात्मा झालेला नाही. मे महिन्यात 22 दहशतवादी कारवाया घडल्या. यंदाच्या अन्य महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे.

शस्त्रसंधीचे उल्लंघन

5 ऑगस्टनंतर ते 29 ऑगस्टपर्यंत सीमेवर पाकिस्तानने 222 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याआधी जुलै महिन्यांत पाकिस्तानने 296 वेळा असे प्रकार केले होते. गेल्या आठ महिन्यात पाकिस्तानने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर 1899 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानकडून असे प्रकार गेल्या वर्षी याच कालावधीत 1889 वेळा घडले होते.

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीArrestअटक