शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 13 दिवसांत बँक मॅनेजर विजय कुमार यांच्या हत्येचा बदला; 2 दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 08:48 IST

Jammu And Kashmir : दोन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असून मोहम्मद लोन असं यातील एका दहशतवाद्याचं नाव आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu And Kashmir) सैन्याला मोठं यश मिळालं आहे. ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. या मोहिमेच्या अंतर्गत शोपियानमध्ये (Shopiana) झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि लष्कर जवानांच्या संयुक्त मोहिमेअंतर्गत शोपियानच्या कांजीउलर भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यावर शोधमोहीम सुरू होती. त्यामध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्यामुळेच 13 दिवसांत बँक मॅनेजर विजय कुमारच्या हत्येचा बदला घेण्यात आला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी हे लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी असून मोहम्मद लोन असं यातील एका दहशतवाद्याचं नाव आहे. कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी राजस्थानचे रहिवासी असलेल्या विजय कुमार या बँक व्यवस्थापकाची बँकेतच गोळ्या झाडून हत्या केली होती. अखेर विजयच्या हत्येचा बदला घेण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. शोपियामध्ये झालेल्या चकमकीत सैन्याने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 

कुलगाम जिल्ह्यातील बँकेचे मॅनेजर विजय कुमार यांची काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी हत्या केली होती. विजयकुमार यांच्या हत्येनंतर अस्वस्थ झालेल्या काश्मीरी पंडितांनी काश्मीर खोरे सोडण्याचा निर्णय घेतला होता. शोपियान जिल्ह्यातील परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर या भागाला वेढा दिला.

दहशतवाद्यांनी याच दरम्यान गोळीबार सुरू केला. जवानांनी देखील गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी मारले गेले. हे दोघेही ‘लष्कर-ए-तोयबा’चे दहशतवादी असून मोहम्मद लोन असं यातील एका दहशतवाद्याचं नाव आहे. याआधी देखील एका अधिकाऱ्याची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान