शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu and Kashmir: राजकीय समीकरणेही बदलली; निवडणुकांची वेळही ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2019 17:08 IST

जम्मू-काश्मीरमध्ये 87 विधानसभा जागा आहेत.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोमवारी जम्मू काश्मीरचे कलम 370 हटविले आहे. तसेच राज्याची पूनर्रचना करताना लडाखला केंद्रशासित प्रदेश केल्याने जम्मू काश्मीरमधील राजकीय समीकरणेही बदलली आहेत. लडाख केंद्र शासित प्रदेश होणार असला तरीही तेथे विधानसभा असणार नाही. तसेच या वर्षीच्या अखेरपर्यंत काश्मीरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी 20 जूनला राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल शासन लागू केले होते. तर 21 नोव्हेंबरला राज्यपालांनी विधानसभा भंग केली होती. तेव्हा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फ्रेन्सने पीडीपीला समर्थन देत सरकार बनविण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर मोदी सरकारने 28 डिसेंबर 2018 ला राष्ट्रपती शासन लागू केले होते. याचा कालावधी संपल्यानंतर जुलैमध्ये सहा महिन्यांनी अवधी वाढविण्यात आला होता. 

जम्मू-काश्मीरमध्ये 87 विधानसभा जागा आहेत. मात्र, लडाख वेगळा झाल्याने चार जागा कमी झाल्या आहेत. म्हणजेच हा प्रस्ताव पास झाल्यास जम्मू काश्मीर विधानसभा 83 जागांची असणार आहे. 

भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतला2014 मध्ये जम्मू-काश्मीरच्या 87 जागांपेकी पीडीपीला 28 आणि भाजपाला 25 जागा मिळाल्या होत्या. तर नॅशनल कॉन्फ्रेन्सला 15 आणि काँग्रेसला 12 जागा मिळाल्या होत्या. भाजपाच्या पाठिंब्यावर पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद हे मुख्यमंत्री झाले होते. मात्र त्यांचे 2016 मध्ये निधन झाले. यानंतर वादंग होऊन त्यांची मुलगी महबूबा मुफ्ती पहिली महिला मुख्यमंत्री बनली. मात्र, हे सरकार तीन वर्षेच चालले. 2018 मध्ये भाजपाने पाठिंबा काढल्याने महबूबा यांना राजीनामा द्यावा लागला होता. 

टॅग्स :Article 370कलम 370Article 35 Aकलम 35-एJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाMehbooba Muftiमहेबूबा मुफ्ती