शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेच्या हत्येनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतीचं वातावरण; 100 हून अधिक हिंदू कुटुंबांनी केलं पलायन- रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 01:15 IST

श्रीनगरच्या दक्षिणेकडील कुलगाममध्ये एका सरकारी शाळेबाहेर दहशतवाद्यांनी मंगळवारी 36 वर्षीय रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

काश्मीर खोऱ्यात वाढलेल्या टार्गेट किलिंगच्या घटनांनी सरकारसमोर नवी समस्या उभी केली आहे. कुलगाममध्ये एका हिंदू शिक्षिकेच्या हत्येनंतर किमान 100 हिंदू कुटुंबांनी काश्मीरमधून पलायन केल्याचा दावा एका समुदायाच्या नेत्याने बुधवारी केला. श्रीनगरच्या दक्षिणेकडील कुलगाममध्ये एका सरकारी शाळेबाहेर दहशतवाद्यांनी मंगळवारी 36 वर्षीय रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.

बारामुल्लामधील काश्मिरी पंडित कॉलनीचे अध्यक्ष अवतार कृष्ण भट यांनी म्हटले आहे, की मंगळवारपासून या भागात राहणाऱ्या ३०० कुटुंबांपैकी जवळपास अर्ध्या कुटुंबांनी स्थलांतर केले आहे. कालच्या हत्येनंतर ते घाबरले होते, असेही ते म्हणाले. एवढेच नाही, तर आम्हीही उद्यापर्यंत निघून जाऊ. आम्ही सरकारच्या उत्तराची वाट पाहत आहोत. ते म्हणाले, सरकारने आमचे काश्मीरमधून बाहेर स्थानांत करण्यास सांगितले होते. 

श्रीनगरचा भाग सील -पोलिसांनी श्रीनगरमधील एक भाग सील केला आहे,  तसेच ज्या भागांत काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी राहत त्या भागांत सुरक्षा वाढवण्यात आली आहे, असा दावा येथील रहिवाशांनी केला आहे. याशिवाय, स्थानिक प्रशासनाने कुटुंबांच्या पलायनासंदर्भात भाष्य केलेले नाही. मात्र, लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी गेल्या महिन्यात काश्मिरी पंडितांना, त्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी