शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

J&K Operation All Out: काश्मीर घाटीत ऑपरेशन ऑल आउट सुरू, गेल्या 24 तासांत 4 दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2022 11:36 IST

J&K Operation All Out: सोमवारी ते मंगळवारदरम्यान सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुपवाडा येथे दोन दहशतवादी मारले गेले तर सोपोर आणि शोपियानमध्ये प्रत्येकी एक दहशतवादी ठार झाला.

Security Forces Killed Terrorist: काश्मीर खोऱ्यात टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्यानंतर सुरक्षा दलांनी ऑपरेशन ऑल आऊट सुरू केले आहे. काश्मिरी पंडितांपासून ते इतर सामान्य लोकांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या दहशतवाद्यांना या ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत ठार केले जात आहेत. या क्रमाने सुरक्षा दलांनी गेल्या 24 तासांत 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

सोमवारी ते मंगळवारदरम्यान सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुपवाडा येथे दोन दहशतवादी मारले गेले तर सोपोर आणि शोपियानमध्ये प्रत्येकी एक दहशतवादी मारला गेला. काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत बैठक झाली होती. या बैठकीत मोदी सरकारच्या दहशतवादाविरुद्ध झिरो टॉलरन्स पॉलिसीची आठवण करून देत, खोऱ्यातील शांतता बिघडवणाऱ्यांना शोधून ठार करण्याच्या सूचना सुरक्षा दलांना देण्यात आल्या होत्या.

दोन पाकिस्तानी दहशतवादीही मारले गेलेठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांचाही समावेश आहे. हे दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तैयबाचे होते. तुफैल असे एका दहशतवाद्याचे नाव आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, कुपवाड्यातील चकतरस कंडी भागात दहशतवादी असल्याच्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. यानंतर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली. यानंतर शोधमोहिमेचे चकमकीत रूपांतर झाले आणि प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली.

दहशतवाद्यांना अटक करण्यात आली72 तासांत सुमारे 18 दहशतवादी आणि त्यांच्या मदतनीसांना अटक करण्यात आली आहे. उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील कठुआ ते कुपवाडापर्यंत या अटक करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांचा समावेश आहे. यांनीच शोपियानमध्ये लष्कराच्या वाहनात आयईडी स्फोट घडवून आणला होता. अटक करण्यात आलेले दहशतवादी आणि त्यांचे सहकारी हे काश्मीरमध्ये लपून बसलेल्या गुलाम या दहशतवादी कमांडरच्या सतत संपर्कात होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान