शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर मुद्दा हा भारताचा अंतर्गत प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 04:52 IST

जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो विषय पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले.

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, तो विषय पूर्णपणे भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले. आॅर्गनायझेशन आॅफ इस्लामिक को-आॅपरेशनने (ओआयसी) जम्मू आणि काश्मीरवर केलेल्या ठरावावर रवीश कुमार शनिवारी बोलत होते.जम्मू आणि काश्मीरसंदर्भातील ठरावांबद्दल बोलायचे तर आमची भूमिका सुसंगत व चांगली परिचित आहे. ५७ देश सदस्य असलेल्या ओआयसीने काश्मीरवर संमत केलेल्या ठरावात भारतावर कठोरपणे टीका करण्यात आल्यावर परराष्ट्र मंत्रालयाने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.तत्पूर्वी, ओआयसीने जम्मू आणि काश्मीरमध्ये जुलै २०१६ पासून अत्याचार वाढल्याचे, अंतर्गत दहशतवाद वाढल्याचे, बेकायदेशीरपणे स्थानबद्ध करून ठेवण्याचे प्रमाण वाढल्याची जोरदार टीका केली होती.भारतावर ओआयसीने काश्मीरवरून टीका करून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भारताच्या हवाई दलाचा विमान पायलट अभिनंदन वर्धमान यांना परत पाठविल्याबद्दल प्रशंसा केली होती.ओआयसीने काश्मीरवर केलेल्या ठरावावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी टीकाकेली.ओआयसीने भारताला खुल्या अधिवेशनासाठी बोलावल्याबद्दल मोदी हे भारताचे मुत्सद्देगिरीचे यश असल्याचे सांगत होते, पण काश्मीर प्रश्नावर याच अधिवेशनाने पाकिस्तानला पाठिंबा देणारा ठराव करणे हे प्रचंड अस्वस्थ करणारे आहे, असे पक्षाचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटले.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या अबुधाबीत झालेल्या अधिवेशनाला गेल्या होत्या. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी म्हटले की, काश्मीर प्रश्नावर ओआयसीने पाकिस्तानला पाठिंबा देणारा ठराव संमत केला आहे. या ठरावात ओआयसीच्या सदस्य देशांनी पुन्हा म्हटले आहे की, जम्मू आणि काश्मीर हा पाकिस्तान व भारत यांच्यातील वादाचा महत्त्वाचा मुद्दा असून, दक्षिण आशियात शांतता असावी या स्वप्नासाठी या अधिवेशनाचा ठराव अपरिहार्य आहे. तिवारी म्हणाले की, हा ठराव म्हणजे मुत्सद्देगिरीचे यश आहे का हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना काँग्रेस विचारू इच्छितो.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज