शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा बरखास्तीवरून काश्मीरमध्ये रणकंदन सुरू, मलिक यांच्यावर तिन्ही पक्षांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 06:22 IST

राज्यात सरकार स्थापनेसाठी आमदारांची सुरू झालेली फोडाफोडी टाळण्यासाठी आणि राज्याच्या हितासाठीच आपण विधानसभा विसर्जित केली, असा दावा काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गुरुवारी केला.

जम्मू/श्रीनगर : राज्यात सरकार स्थापनेसाठी आमदारांची सुरू झालेली फोडाफोडी टाळण्यासाठी आणि राज्याच्या हितासाठीच आपण विधानसभा विसर्जित केली, असा दावा काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गुरुवारी केला. मात्र मोदी सरकारच्या दबावावरूनच विधानसभा विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेससह सर्व पक्षांनी त्यांच्यावर केला.आपणास मेहबुबा मुफ्ती यांचे सत्ता स्थापनेसंबंधीचे पत्र मिळालेच नाही, असे सांगून मलिक म्हणाले की, काल, बुधवारी पैगंबर जयंती असल्याने सरकारी कार्यालयांना सुटी होती, हे मेहबुबा व ओमर अब्दुल्ला यांना माहीत असायला हवे होते.राज्यपालांचा हा निर्णय घटनाविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केला. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, राज्यात लोकनियुक्त सरकार यावे, याचसाठी आम्ही पीडीपीला पाठिंबा दिला होता. आमदारांच्या खरेदी-विक्रीची माहिती राज्यपालांनी जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली.विधानसभा विसर्जित झाल्याने थंडी संपताच राज्यात निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस या तिघांनी केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनीही काश्मीरमध्ये सहा महिन्यांत निवडणुका व्हायला हव्यात, असे दिल्लीत सांगितले.माधव यांची माघारसीमेपलीकडून (पाकिस्तान) निरोप आल्यानेच पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेसने मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी केला होता. त्यावर माधव यांनी आरोप सिद्ध करावा, असे आव्हान ओमर अब्दुल्ला यांनी दिले. त्यानंतर राम माधव यांनी आपण विधान मागे घेत असल्याचे नमूद करीत, मी तुमच्या देशप्रेमाबद्दल शंका व्यक्त करीत नाही, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर