शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

जम्मू-काश्मीर : कुलगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, तीन दहशतवाद्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 11:13 IST

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी (22 जुलै) पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली.

श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी (22 जुलै) पहाटेच्या सुमारास सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलानं परिसराला घेराव घातला. यानंतर एन्काऊंटर सुरू करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाममधील खुदवानी परिसरातील वानी मोहल्ला येथे एन्काऊंटर सुरू आहे. परिसरातील एका घरामध्ये दहशतवादी लपले आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. खबरदारी म्हणून जवानांनी संपूर्ण परिसर रिकामा केला आहे. 

दरम्यान, शनिवारी (21 जुलै) जम्मू काश्मीर पोलीस दलातील पोलीस शिपाई सलीम शाह यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करुन निर्घृण हत्या केली. सलीम शाह दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथील रहिवासी होते.  शनिवारी सकाळी पोलिसाचे अपहरण करून नंतर हत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह कुलगाम परिसरात आढळून आला. कथुआमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई सलीम शाह सध्या रजेवर होते. कुलगाम जिल्ह्यातील मुथलामा भागातील त्यांच्या घरातून दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण केले होते. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. अलीकडेच आणखी एका पोलीस व जवानाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. नंतर त्यांना मारून टाकण्यात आले.

अनंतनाग जिल्ह्यातही शनिवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. सुरक्षा दलाने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मट्टनस्थित बमजू भागात अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. 

 

 

 

 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीर