शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

Jammu and Kashmir : 370वर जोरदार भाषण देणारा खासदार हैराण; म्हणे, 'अधिक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू शकत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2019 13:01 IST

लडाखचे भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी जोरदार भाषण केलं.

नवी दिल्लीः मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं असून, जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यानंतर आज लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला आहे.यादरम्यान लडाखचे भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी जोरदार भाषण केलं. लोकसभेत 370वर झालेल्या वादळी चर्चेत त्यांच्या भाषणानं सगळेच प्रभावित झाले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. नामग्यालनं आता ट्विट करत एक अडचण सांगितली आहे. ते म्हणाले, फेसबुकवर आणखी अधिक लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू शकत नाही. कारण फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्याची मर्यादा संपुष्टात आलेली आहे.कारण 5 हजारांची मर्यादा केव्हाच पार झाली आहे. त्यामुळे माझ्या फेसबुक पेजला लाइक करा आणि तिकडेच सक्रिय राहा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नामग्याल यांनी केलेलं भाषण उत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे. ते लडाखमधल्या आमच्या बहीण आणि भावांच्या अपेक्षांची पूर्तता करतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती. जामयांग शेरिंग यांचं भाषण ऐकल्यानंतर अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह सर्व खासदारांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं होतं. जामयांग शेरिंग यांनी म्हणाले होते की, आज भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. जवाहरलाल नेहरू यांनी केलेली चूक मोदींनी सुधारली आहे. 70 वर्ष काँग्रेस-पीडीपी-नॅशनल कॉन्फ्ररन्सने लडाखला सापत्न भावाची वागणूक दिली. या लोकांना लडाखबद्दल काहीच माहीत नाही. पुस्तकी वाचनातून हे लोक बोलत आहेत. ते पुढे म्हणाले, 'सुरुवातीपासूनच आम्हाला देशाचा अभिन्न अंग बनायचं होतं. आम्ही तेव्हा देखील म्हटलं होतं की, लडाखला काश्मीर सोबत ठेवू नका. अनुच्छेद 370 मुळे आमचा विकास झाला नाही. यासाठी काँग्रेस पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Article 35 Aकलम 35-ए