शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू काश्मीरमध्ये 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा; 'हिजबुल'चा टॉप कमांडर ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 09:29 IST

Jammu And Kashmir And Terrorists : गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने केलेली ही मोठा कामगिरी आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये सैन्याला मोठं यश मिळालं आहे. गेल्या 24 तासांत 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये 'हिजबुल'चा टॉप कमांडर देखील ठार झाला आहे. पुलवामा आणि कुलगाम चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. त्यासोबतच घाटीमध्ये गेल्या 24 तासांत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने केलेली ही मोठी कामगिरी आहे. काश्मीर पोलीस आयजीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत 5 दहशतवादी ठार झाले आहे. यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलाचं त्यांनी अभिनंदन केलं आहे. पुलवामाच्या परिसरात बुधवारी रात्री चकमक सुरू झाली होती.  

काही दहशतवादी परिसरात लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या परिसराला घेराव घालण्यात आला होता. त्याच दरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. त्य़ाशिवाय कुलगामच्या जोदार परिसरात पोलीस आणि 01 आरआर यांचं एक जॉईंट ऑपरेशन झालं. त्यामध्ये दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. काही ठिकाणी अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू आहे.  सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद (Mehrazuddin Halwai) याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती मिळत आहे. जम्मू काश्मीर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफ जवानांनी एका संयुक्त मोहिमेत या दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. 

काश्मीरच्या पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल मुजाहिद्दीनचा सर्वात जुना, अनुभवी आणि टॉप कमांडर्सपैंकी एक असलेल्या मेहराजुद्दीन हलवाई याचा खात्मा करण्यात आला आहे, तो अनेक मोठ्या कटामध्ये सहभागी होता. त्यामुळेच हे खूप मोठं यश आलं. मंगळवारी रात्री उशिरा हंदवाडाच्या क्रालगुंडच्या पाजीपोरा-रेनान भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत चकमक घडून आली. मिळालेल्या माहितीनुसार, सेनेच्या 32 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफची 92 बटालियनची एक संयुक्त टीम या भागातील मोहिमेत सहभागी झाली होती. दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाकडून हे ऑपरेशन हाती घेण्यात आलं होतं. उत्तर काश्मीरच्या हंदवाडा भागात झालेल्या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं. 

मोठं यश! 'हिजबुल'चा टॉप कमांडर मेहराजुद्दीन हलवाईचा खात्मा

मेहराजुद्दीन याचा खोऱ्यात अशांतता पसरवण्यात तसंच अनेक दहशतवादी कारवायात थेट सहभाग होता. तसेच परिसरात आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असल्याने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. काश्मीरमध्ये दहशतवादाचाच खात्मा करण्यासाछी सुरक्षा दलाच्या वतीने सातत्याने ऑपरेशन ऑलआऊट सुरू आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता सुरक्षा दलांसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. हायब्रीड दहशतवाद्यांच्या रुपात सुरक्षा दलांचे जवान श्रीनगरसह काश्मीर खोऱ्यात अडचणींचा सामना करत आहेत. दहशतवादी कारवाया घडवल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे जीवन जगणारे दहशतवादी सुरक्षा दलांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. 

 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादterroristदहशतवादी