शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Jammu And Kashmir : मोठी कारवाई! श्रीनगर चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; 4 जवान जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 12:07 IST

Jammu And Kashmir : पंथाचौक भागातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घातला.

नवी दिल्ली - जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. श्रीनगरच्या बाहेर पंथाचौक भागात एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाच्या जवानांना यश आलं आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाचे जवान यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. पंथाचौक भागातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घातला. दरम्यान इमारतीमध्ये लपलेल्या दहशवाद्यांनी गोळीबार केला.

गोळीबारामध्ये जम्मू-काश्मीर पोलीस दलातील तीन जवान आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचा एका जवान जखमी झाला आहे. त्यानंतर सुरक्षा दलांनी आक्रमक पावले उचलत कारवाईला सुरुवात केली. यामध्ये झालेल्या गोळीबारात इमारतीमध्ये लपलेल्या तीन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. गेल्या 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गुरुवारी सैन्याला मोठं यश मिळालं होतं. जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं होतं. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. यासंदर्भातील माहिती स्थानिक पोलीस प्रशासनानेच दिली आहे.

दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.  दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. ही कारवाई सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठं यश आहे.

सैन्याला मोठं यश! कुलगाम, अनंतनाग चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा

बुधवारी सायंकाळी दक्षिण काश्मीरमधील दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या कारवाया सुरू करण्यात आल्या होत्या. काश्मीर पोलिसांनीही ट्विटरवरुन यासंदर्भातील माहिती दिली. सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून त्यापैकी चौघांची ओळख पटली आहे. यातील दोघे पाकिस्तानी असून इतर दोघे स्थानिक आहेत. इतर दोन दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. अनंतनागमधील नवगाम परिसरामध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या कर्मचाऱ्याला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवाद