शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

गाझीपूर सीमेवर वाहतूक कोंडीत अडकलेले लोक संतापले; काँग्रेस कार्यकर्त्यांना चपलेने चोपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:10 IST

तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्याने संतप्त झालेल्या लोकांनी काँग्रेस नेत्यांवर आपला राग काढण्यास सुरुवात केली.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी आज संभलला जाण्यासाठी रवाना झाले होते. परंतु त्यांना यूपी सीमेवर पोलिसांनी रोखलं. त्यांचा ताफा पुढे जाऊ शकला नाही. खूप संघर्ष केल्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी यांचा ताफा दिल्लीला परत पाठवण्यात आला, त्यानंतर काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते दिल्लीला परतले. येथून राहुल आणि प्रियंका यांच्यासह काँग्रेसचे सर्व खासदार संसदेत गेले.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी संभलला जाण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यूपी सीमेवर त्यांच्या ताफ्याला रोखण्यासाठी आधीच वाहतूक बंद करण्यात आली होती. प्रशासनाच्या या कठोरपणामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागला. काहींना त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही तर काहींना सुनावणीसाठी न्यायालयात जायचं होतं पण जाता आलं नाही. तासनतास वाहतूक कोंडीत अडकल्याने संतप्त झालेल्या लोकांनी काँग्रेस नेत्यांवर आपला राग काढण्यास सुरुवात केली. संतालेल्या लोकांची काँग्रेस कार्यकर्त्यांशी झटापट झाली आणि काही कार्यकर्त्यांना चपलेही चोपलं.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकाराने लोकांशी संवाद साधला तेव्हा एका व्यक्तीने सांगितलं की, ते आपल्या मुलीला परीक्षेसाठी घेऊन जात होते. मात्र ते आता ट्रॅफिक जॅममध्ये अडकले. नरेंद्र सिंह यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलीची मेरठमध्ये परीक्षा आहे. मात्र दिल्ली-यूपी सीमेवर ट्रॅफिक जॅममध्ये ते अडकले आहेत. इथून बाहेर पडू शकत नाही. रस्त्यावर लोकांना त्रास का दिला जात आहे, असा सवाल त्यांनी विचारला.

एका व्यक्तीने सांगितलं की, त्याला सुनावणीसाठी कोर्टात जायचं होतं, मात्र ट्रॅफिक जॅममध्ये अडकल्यामुळे कोर्टाच्या सुनावणीला ते पोहोचू शकले नाहीत. एक व्यक्तीला वडिलांच्या अंत्यसंस्काराला जायचं होतं, मात्र ट्रॅफिक जॅममुळे तो वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकला नाही. एका तरुणाची दुपारी १२ वाजता ऑफिसमध्ये मिटींग होती, मात्र तो ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे ऑफिसला पोहोचू शकला नाही. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसTrafficवाहतूक कोंडीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधी