गिरणाचे आज आवर्तन सुटणार पाचोर्यापर्यंत पाणी : पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
By admin | Updated: March 11, 2016 00:27 IST
जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे.
गिरणाचे आज आवर्तन सुटणार पाचोर्यापर्यंत पाणी : पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
जळगाव : गिरणा धरणातून जळगाव जिल्ासाठी दुसरे आवर्तन गुरुवारी रात्री सोडण्यात येणार आहे. ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार असल्याने हे पाणी पाचोरापर्यंत येणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केली आहे.गिरणा धरणावर जळगाव व नाशिक जिल्ातील पाच नगरपालिकांच्या पाणी योजना आहेत. यासह १५८ गावे व २१८ पाणी योजना या धरणावर अवलंबून आहे. काही दिवसांपासून चाळीसगाव, भडगाव व पाचोरा परिसरात भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे गिरणा धरणाचे दुसरे आवर्तन सोडण्याबाबत मागणी होत होती. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी पाणी टंचाईचा बुधवारी आढावा घेतला होता. त्यानंतर गिरणा पाटबंधारे विभागामार्फत आवर्तन सोडण्याबाबत अभिप्राय पाठविण्यात आला आहे. त्यामुळे गुरुवारी मध्यरात्री गिरणा धरणावरून पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या गिरणा धरणात २६० दलघफूट जिवंत पाणी साठा आहे. तर तीन हजार दलघफू मृतसाठा आहे. तीन हजारामध्ये १५०० दलघफू गाळ आहे. या धरणातून जळगाव जिल्ासाठी ८०० दलघफू पाणी सोडण्यात येणार आहे. त्यात २६० दलघफू जिवंत साठा तर ५४० मृत पाणी साठ्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. हा जलसाठा पाचोरा तालुक्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.दापोरा बंधार्यापर्यंत पाणी मृगजळचगिरणेचे आवर्तन दापोरा बंधार्यापर्यंत सोडण्यात यावे अशी मागणी या भागातील सरपंच व ग्रामस्थांनी केली होती. मात्र सध्या सोडण्यात येणारे पाणी हे केवळ पाचोर्यापर्यंत येणार असल्याने म्हसावद, शिरसोली, वावडदा, दापोरा, मोहाडी यासह ३१ गावांची निराशा झाली आहे. गिरणेचे पाणी या ३१ गावांना मिळणार नसल्याने भविष्यात या गावांमधील पाणी टंचाईची स्थिती गंभीर होणार आहे.जलसंपदा मंत्र्यांची मध्यस्थी महत्त्वाचीनाशिक जिल्ातील मालेगाव व अन्य गावांना चणकापूर, हरणबारी, नागासाक्या, गिरणा या धरणांमधून पाण्याचा स्त्रोत उपलब्ध आहे. त्यामुळे किमान १२०० दलघफूट पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जिल्हा प्रशासनाची आहे. मात्र नाशिक जिल्हा प्रशासन फक्त ८०० दलघफूट पाणी सोडण्यावर ठाम आहे. नाशिकचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून वाढीव पाणी सोडण्यास मंजुरी दिल्यास दापोरा बंधार्यापर्यंत पाणी येऊन ३१ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडू शकतो.