शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

मदुराईमध्ये आज जलीकट्टू

By admin | Updated: January 22, 2017 00:35 IST

राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी जलीकट्टू खेळासाठीच्या वटहुकुमावर स्वाक्षरी केल्याने संपूर्ण तामिळनाडूमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

चेन्नई/मदुराई : राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी जलीकट्टू खेळासाठीच्या वटहुकुमावर स्वाक्षरी केल्याने संपूर्ण तामिळनाडूमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मदुराईच्या जिल्हा प्रशासनानेही रविवारी जलीकट्टू या बैलांच्या खेळाला या वटहुकुमाच्या आधारे परवानगी दिली असून, जिल्ह्याच्या अलंगनल्लूर या गावी हे खेळ होणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून, मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम तिथे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे सध्या तामिळनाडूचीही सूत्रे आहेत. जलीकट्टूला संमती देणाऱ्या वटहुकुमावर स्वाक्षरी करण्यासाठी ते आज दुपारी खास मुंबईहून चेन्नईला आले. तिथे पोहोचल्यावर त्यांनी लगेचच त्यावर सह्या केल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. केंद्र सरकारने याआधीच जलीकट्टूसाठी वटहुकूम काढण्यास हिरवा कंदिल दाखवला होता. अर्थात यंदा हा खेळ होणार असला तरी हे प्रकरण न्यायालयप्रविष्ट आहे. रविवारी जलीकट्टू होईल. मात्र तो कायमस्वरूपी होणार का, हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे. वटहुकुमाची मुदत सहा महिने असते. त्यावर तामिळनाडू विधानसभेते सहा महिन्यांच्या आत शिक्कामोर्तब करणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)