नवी दिल्ली : वित्तमंत्री अरुण जेटली हे डीडीसीए घोटाळ्याच्या चौकशीपासून ‘पळ’ काढत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे. जेटली यांच्यावर आरोप लावल्याबद्दल आपने जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना आपने हा आरोप केला.‘जेटली निर्दोष असल्याचा भाजपाला पक्का विश्वास असेल तर जेटली चौकशीपासून पळ का काढत आहेत? त्यांनी ही चौकशी शेवटास नेली पाहिजे. जेटली चौकशीपासून का पळ काढतात? जेटलींनी लालकृष्ण अडवाणींचे उदहारण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यामुळे जेटलींनी पुढे येऊन देशापुढे हे उदाहरण सादर केले पाहिजे,’ असे आपचे नेते आशुतोष यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)माझ्या घरीमफलरच मिळतील‘जर सीबीआय अधिकाऱ्यांनी माझ्या घरावर छापा घातला तर त्यांना असंख्य मफलर मिळतील, दुसरे काहीही मिळणार नाही,’ अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्ली सचिवालयावरील सीबीआयच्या छाप्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले.आॅटो परमिटमधील कथित भ्रष्टाचारावरून परिवहन विभागाच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याचा उल्लेख करून अरविंद केजरीवाल म्हणाले, हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यातयेणार आहे. आम्ही तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे आणि दक्षता आयोगाकडून चौकशी करण्याचा आदेशही दिलेला आहे.
जेटली पळपुटे आहेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 04:07 IST