शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

जेटली मानहानीप्रकरणी न्यायालयानं केजरीवालांना ठोठावला 10 हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 20:57 IST

दिल्ली उच्च न्यायालयानं जेटली अवमान प्रकरणात केजरीवालांना खडे बोल सुनावले आहेत.

नवी दिल्ली, दि. 26 - दिल्ली उच्च न्यायालयानं जेटली अवमान प्रकरणात केजरीवालांना खडे बोल सुनावले आहेत. आम आदमी पार्टीच्या पाच नेत्यांविरोधात जेटलींनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यातील सुनावणीवेळी जेटलींना अपमानास्पद प्रश्न विचारू नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयानं आपच्या नेत्यांना दिले आहेत. तसेच या प्रकरणात कोर्टानं केजरीवालांना 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.  न्यायमूर्ती मनमोहन म्हणाले, मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केंद्रीय अर्थमंत्री जेटलींशी सन्मानानं आणि कायद्याच्या भाषेनुसार त्यांचा आदर केला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवली पाहिजे. न्यायालयात अभद्र भाषेचा कोणीही वापर करू नये. तसेच मानहानी खटल्यात योग्य रीतीनं जबाब नोंदवून घेतले पाहिजेत. जेटली मानहानी प्रकरणात केजरीवालांसह राघव चड्ढा, कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह आणि दीपक वाजपेयींनाही आरोपी बनवण्यात आलं आहे. अरुण जेटलींनी 2000 ते 2013मध्ये डीडीसीएच्या अध्यक्षपदावर असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आप नेत्यांनी केला होता. जेटलींनी ते आरोप फेटाळूनही लावले आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या 10 कोटींच्या बदनामी दाव्याचा खटला लढणारे प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी केजरीवाल यांना सोडचिठ्ठी दिली आहे. जेठमलानी यांनी केजरीवाल यांना एक पत्र लिहून या प्रकरणातून बाजूला होत असल्याचं सांगितलं आहे. तसंच या खटल्याचं 2 कोटी रुपयांहून अधिक फी द्यावी, असंही त्यांनी म्हटलं आहे. जेठमलानी यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात,'केजरीवाल हे अरुण जेटलींच्या विरूद्ध जास्त आक्षेपार्ह भाषेचा वापर करायचे', असा आरोप केला आहे. जेठमलानी यांनी त्यांच्या 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त कायदेशीर फीची मागणीही केली आहे. केजरीवाल आणि इतर पाच आप नेत्यांविरोधात अरुण जेटली यांनी 10 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीवेळी जेठमलानी यांनी केजरीवाल यांची बाजू मांडताना केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात असभ्य भाषेचा वापर केला होता. केजरीवाल यांनी दिलेल्या सूचनेवरून असभ्य भाषेचा वापर केला का, याबाबत जेटली यांनी स्पष्टीकरण मागितलं होतं. त्यावेळी जेठमलानी यांनी आपण केजरीवाल यांच्या सूचनेनुसारच असभ्य भाषेचा वापर केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर जेटली यांनी केजरीवाल यांच्याविरोधात आणखी एक मानहानीचा खटला दाखल केला होता. हा नवा खटला दाखल झाल्यानंतर केजरीवाल यांनी दिल्ली हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. तसंच जेटली यांच्याविरोधात असभ्य भाषा वापरली जावी, अशा कोणत्याही सूचना आपण दिल्या नव्हत्या, असं त्यांनी जेठमलानी यांना पत्रात सांगितलं होतं