शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कॉर्पोरेट झगमगाट सोडून जयशंकर परराष्ट्र मंत्रालयात झाले रुजू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 04:42 IST

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बजावली मोलाची भूमिका

टेकचंद सोनवणे नवी दिल्ली : परराष्ट्र सचिवपदावरून निवृत्त झाल्यानंतर मिळालेले टाटा सन्सच्या ग्लोबल कॉर्पोरेट अफेअर्सचे अध्यक्षपद सोडून देणारे नवनियुक्त परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यामुळे भारताच्या ‘डिप्लोमसी’ला महत्त्वाचे वळण मिळाले आहे. जयशंकर यांची टाटा सन्समध्ये गेल्या वर्षीच नेमणूक झाली होती. कोट्यवधी रुपयांचे मानधन, जगात कुठेही मिळणाऱ्या सोयी-सुविधा नाकारून जयशंकर यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याची ‘ल्यूटन्स’ दिल्लीत चर्चा आहे.

टाटा समूहाच्या जगभरातील सर्व उद्योगांची जबाबदारी जयशंकर यांच्यावर होती. परदेशात व्यापारविस्तार आणि कमी व्यापार असलेल्या देशांशी संपर्क करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. परराष्ट्र सेवेतील अनुभवांचा फायदा मात्र पुन्हा देशासाठीच करण्याची तीव्र इच्छा जयशंकर यांना होती. त्याविषयी ते पहिल्यांदा बोलले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी.

डोवाल यांनी हा निरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवला. गेले वर्षभर जयशंकर परराष्ट्र धोरणात वेळोवेळी सल्ला देतच होते. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या माध्यमातून ‘समांतर डिप्लोमसी’ राबविताना त्यांनी मोलाचा सल्ला दिला. आयसीसीआरकडून विदेशात सांस्कृतिक संचालक नेमताना मुलाखत घेण्यासाठी स्वत: ते उपस्थित होते.

विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनशी संबंधयूपीएच्या काळात डोवाल यांनी विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशनद्वारे जयशंकर यांच्यासारख्या अनेक बुद्धिमान अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. फाऊंडेशनच्या वास्तूत जयशंकर अनेकदा आले, बोलले. निवृत्तीनंतर त्यांना ‘उजव्या’ विचारसरणीच्या व्यासपीठावर आणण्याची जबाबदारी डोवाल यांनी पुरेपूर सांभाळली. एकीकडे अमेरिकेची अरेरावी, तर दुसरीकडे चीनची आशिया खंडातील दादागिरी या पार्श्वभूमीवर जयशंकर यांना परराष्ट्रमंत्री करण्याचा डोवाल यांचा प्रस्ताव पंतप्रधान मोदी यांनी तात्काळ मान्य केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकार