शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

जवानांनी स्नायपर्सला घातले कंठस्नान, दहशतवादी मसूद अझरच्या भाच्याचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 07:38 IST

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश मिळालं आहे. लष्कराच्या जवानांनी पुलवामातल्या त्रालमध्ये जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

काश्मीर- जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश मिळालं आहे. लष्कराच्या जवानांनी पुलवामातल्या त्रालमध्ये जैश ए मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात पाकिस्तानच्या स्नायपरचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हा स्नायपर दहशतवादी मसूद अझरचा भाचा आहे, अशीही माहिती समोर आली आहे. मंगळवारी त्रालमधल्या मंडुरा इथे दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली. तेव्हा त्याचा खात्मा करण्यात आला. हा भाग दक्षिण काश्मीरमध्ये येतो.रिपोर्टनुसार, लष्करानं गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार या भागात सर्च ऑपरेशन राबवलं होतं. त्यातच उस्मान हैदर हा स्नायपर लष्कराच्या हल्ल्यात ठार झाला. या ऑपरेशनमध्ये 42 राष्ट्रीय रायफल्स, एसओजी आणि सीआरपीएफच्या जवानांचा समावेश होता. जवानांनी त्रासमधल्या दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरुवात केली. लष्करी जवानांबरोबर झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ज्या घरातून हे दहशतवादी गोळीबार करत होते. लष्कराच्या जवानांनी ते घरच उडवून दिलं. त्या ठिकाणाहून जवानांनी दोन दहशतवाद्यांचे मृतदेह आणि एमफोर स्नायपर रायफल हस्तगत केली आहे. सप्टेंबरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन गट काश्मीरमध्ये आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिली होती. त्या दोन गटांमध्ये एकूण चार प्रशिक्षित दहशतवाद्यांचा (स्नायपर्स) समावेश होता.काश्मीरमध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात जवान जखमी झाले होते. तेव्हापासूनच हे स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयने या चौघांनाही प्रशिक्षण दिल्याची माहिती उघड झाली आहे. स्नायपर्सकडे एम-4 कार्बाइन्स रायफल्स आहेत. स्नायपर्स नाईट व्हिजन डिव्हाईसचा वापर करून रात्रीच्या वेळी 500 ते 600 मीटर अंतरावर असून देखील लपून वार करू शकतात. त्यामुळे डोंगरातून हल्ले करणे सोपे जाते. लष्कर आणि सुरक्षा दलांपुढे या इतर स्नायपर्सना शोधून त्यांचा खात्मा करण्याचं मोठे आव्हान आहे. 

टॅग्स :Terrorismदहशतवादterroristदहशतवादी