शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भारताची ओळख निर्माण करण्यात जैन धर्माची अमूल्य भूमिका : पंतप्रधान मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 11:50 IST

नवकार महामंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जैन धर्माने भारताची ओळख निर्माण करण्यासाठी अमूल्य भूमिका पार पाडली आहे. या धर्माची शिकवण व मूल्यामुळे दहशतवाद, युद्ध व पर्यावरण संरक्षण यांसारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी मोलाची मदत झाल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या प्राचीन धर्माचा वारसा आणि शिकवणीचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. नवकार महामंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथे आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी बोलत होते.

मोदी म्हणाले, तीर्थंकरांची शिकवण व मूर्तींच्या माध्यमातून या धर्माचा प्रभाव संसद भवनातही दिसून येतो. जैन धर्मातील अनेकांतवाद या सिद्धांतात वेगवेगळ्या दृष्टिकोनाची प्रशंसा केलेली आहे. अनेकांतवाद जैन धर्मात निरपेक्षतेला प्रोत्साहन देणारा एक प्रमुख सिद्धांत असल्याने अंतिम सत्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहता येते. हा धर्म शांतता, सौहार्द व पर्यावरण संरक्षणाची शिकवण देणारा आहे. हवामान बदल आजचे सर्वांत मोठे संकट असून, स्थायी जीवनशैली हे त्यावरील समाधान आहे. हा समुदाय स्थायी जीवनशैलीचे पालन करत असल्याचे सांगत मोदींनी जैन धर्माची प्रशंसा केली. ‘जितो’चे चेअरमन पृथ्वीराज कोठारी,  ‘जितो’चे प्रेसिडेन्ट विजय भंडारी आणि गुजरातचे मंत्री हर्ष संघवी यांचा नामोल्लेख करून पंतप्रधानांनी त्यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी ‘जितो’चे प्रतिनिधी   विज्ञान भवनात उपस्थित होते. 

जैन साहित्य हे भारताच्या  आध्यात्मिक वैभवाचा कणाजैन धर्माचे साहित्य भारताच्या आध्यात्मिक वैभवाचा कणा आहे. त्याचे संरक्षण करण्यासाठी केंद्राने अनेक उपाययोजना केल्या आहेत. प्राचीन जैन  ग्रथांचे डिजिटायझेशन, पाली व प्राकृत भाषेला शास्त्रीय भाषा घोषित करणे, यासारख्या योजना सुरू केल्या आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी