जैन सोशल ग्रुपतर्फे महावीर जयंती साजरी
By admin | Updated: April 4, 2015 01:54 IST
सोलापूर : जैन सोशल ग्रुप व सहयोगी युवा फोरम समिती आणि चिल्ड्रन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जन्मकल्याणक दिवसाची सुरुवात महावीर चौकातील फलकास पुष्पहार घालून करण्यात आली.
जैन सोशल ग्रुपतर्फे महावीर जयंती साजरी
सोलापूर : जैन सोशल ग्रुप व सहयोगी युवा फोरम समिती आणि चिल्ड्रन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जन्मकल्याणक दिवसाची सुरुवात महावीर चौकातील फलकास पुष्पहार घालून करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत चाटी गल्लीत सरबत वाटप करण्यात आले. चिल्ड्रन फोरमच्या सदस्यांनी विविध धार्मिक वेशभूषा करून लक्ष वेधले होते. खाऊ वाटप व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात अध्यक्ष संदीप वैद, सजल गुलेच्छा, ललित वैद, उन्मेश करणावट, हर्षल कोठारी, चेतन संघवी, प्रवीण भंडारी, मनमोहन वैद, संजय पाटील, गौतम छाजेड, भद्रेश शहा, नीताबेन शहा, हेमा वैद, प्रीती करनावट, रंजना शहा, निर्मला मेहता, साहिल भंडारी, अंशुल राका, रिद्दी शहा, ईशा करनावट, दृष्टी शहा यांनी भाग घेतला. 0000महावीर चौकातील फलकास पुष्पहार घालून भगवान महावीर जन्मकल्याणक दिवसाची सुरुवात जैन सोशल ग्रुप, युवा फोरम समिती, चिल्ड्रन फोरमचे संदीप वैद, सजल गुलेच्छा, ललित वैद, उन्मेश करनावट, हर्षल कोठारी, चेतन संघवी, प्रवीण भंडारी, मनमोहन वैद, संजय पाटील आदी दिसत आहेत.