महामार्गावरील खड्ड्याने घेतला तिघांचा बळी जैन इरिगेशनजवळील घटना : अज्ञात वाहनाच्या धडकेत जैन कंपनीचे कामगार ठार; पिंप्राळ्यातील गढी चौकात शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2016 00:39 IST
जळगाव: खराब साईडप्या व खड्ड्यामुळे महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. दोन दिवसापूर्वी शिव कॉलनीजवळ मू.जे.महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्य व्ही.जे. चौधरी यांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री ११.५५ वाजता जैन इरिगेशनजवळ एका खड्ड्यात दुचाकी आदळल्याने कंपनीचे तीन कामगार महामार्गावर कोसळले व त्याच वेळी येणार्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला.
महामार्गावरील खड्ड्याने घेतला तिघांचा बळी जैन इरिगेशनजवळील घटना : अज्ञात वाहनाच्या धडकेत जैन कंपनीचे कामगार ठार; पिंप्राळ्यातील गढी चौकात शोककळा
जळगाव: खराब साईडप्या व खड्ड्यामुळे महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. दोन दिवसापूर्वी शिव कॉलनीजवळ मू.जे.महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्य व्ही.जे. चौधरी यांना चिरडल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री ११.५५ वाजता जैन इरिगेशनजवळ एका खड्ड्यात दुचाकी आदळल्याने कंपनीचे तीन कामगार महामार्गावर कोसळले व त्याच वेळी येणार्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. निवृत्ती विक्रम महाजन (वय ३६ मुळ रा.खर्ची ता.एरंडोल ह.मु.पिंप्राळा, गढी चौक, जळगाव), संतोष कहारु कोळी (वय ४० रा.पिंप्राळा गढी चौक, जळगाव) व निवृत्ती भागवत पाटील (वय ४५ मुळ रा.कोळवद, ता.यावल, ह.मु.पिंप्राळा गढी चौक, जळगाव) यांचा अपघातात मृत्यू झाला. चार महिन्यापूर्वी याच ठिकाणी खड्ड्यामुळे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा मुलगा आदर्श हा अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला होता.तिघांवर काळाची झडप निवृत्ती महाजन, संतोष कोळी व निवृत्ती पाटील हे तिघेही पिंप्राळा गढी चौक येथे राहायला होते. तिघं बांभोरी येथील जैन इरिगेशन कंपनीत व एकाच विभागात कामाला असल्याने त्यांची रात्री १२ ते सकाळी आठ अशी ड्युटी होती. त्यामुळे तिघं जण संतोष कोळी याच्या दुचाकीने (क्र.एम.एच.१९ ए.एम.४७४६) ११.४५ वाजता घरुन निघाले. महामार्गावर असलेला पेट्रोल पंप व जैन इरिगेशन याच्या दरम्यान असलेल्या एका खड्ड्यात रात्री ११.५५ वाजता त्यांची दुचाकी आदळली. त्यामुळे दुचाकी रस्त्याच्या कडेला तर तिघंही महामार्गावर पडले व त्याच वेळी भरधाव वेगाने येणार्या अज्ञात वाहनाने तिघांना जोरदार धडक दिली.पंधरा मिनिटे जागेवरच विव्हळलेअपघातानंतर तब्बल पंधरा मिनिटे तिघं जण जागेवरच विव्हळत होते.दुसरी शिफ्ट संपल्यानंतर घरी जाण्यासाठी कामगार बाहेर पडले तेव्हा रस्त्यावर तिघं जण पडल्याचे दिसले. कामगारांनी लागलीच सुरक्षा रक्षकांना ही माहिती दिली. त्यानंतर पाळधी दूरक्षेत्राच्यापोलीस कर्मचार्यांनीही धाव घेतली. कंपनीच्या वाहनातूनच त्यांना जळगावला हलविण्यात आले.एकाने जागेवरच तर दोघांनी रुग्णालयात सोडले प्राणडोक्याला जबर मार बसल्यामुळे निवृत्ती महाजन याचा जागेवरच मृत्यू झाला तर संतोष कोळी यांनीजिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळच प्राण सोडले. निवृत्ती पाटील यांनी नाहाटा हॉस्पिटलमध्ये दोन वाजता प्राण सोडला. शनिवारी दुपारी तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले. निवृत्ती महाजन याचा मृतदेह खर्ची येथे नेण्यात आला तर अन्य दोघांवर पिंप्राळा येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.