शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

जय जय रामकृष्ण हरी... PM मोदींकडून वारकरी अन् भाविकांना आषाढीच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 21:41 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पत्र पाठवून वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मुंबई - महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगाची महापूजा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी, लाखोंचा जनसागर भीमातिरी जमला आहे. काय हे रिंगण.. काय हा पाऊस... काय ही गर्दी... आणि काय हा वारकऱ्यांचा उत्साह... असा दैदिप्यमान सोहळा, वैष्णवांचा मेळा पंढरपूरात जमला आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरात येत आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना पत्र पाठवून वारकरी आणि भाविकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

काय झाडी, काय डोंगार, काय हाटील... या आमदार शहाजीबापू पाटील यांचा संवाद मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या संवादाची भुरळ आषाढी यात्रेच्या निमित्ताने आलेल्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील वारकऱ्यांनाही झाल्याचं दिसून आलं. वारकऱ्यांच्या तोंडी शुक्रवारी हा डायलॉग पुन्हा ऐकावयास मिळाला. वारीत वातावरण भक्तीमय झालं असून पांडुरंगाच्या ओढीने लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरात पोहोचले आहेत. या वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासनही कामाला लागलं आहे. तर, स्वयंसेवी संस्थाही पुढाकार घेत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आषाढीच एकादशीनिमित्त वारकरी आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. जय जय रामकृष्ण हरी.. असे म्हणत मोदींनी आषाढीचं महत्त्वही समजावून सांगितलं आहे.    माझी पांडुरंगावरची श्रद्धा अढळ आहे. शतकानुशतकं चालत आलेल्या पताका-दिंडी, वारीकडं आजही जगातील सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सामूहिक यात्रा (वारी) म्हणून पाहिलं जातं. वारकरी चळवळ ही आपल्या समृद्ध परंपरांचं प्रतिक आहे. दिंडी यात्रा ही भारताच्या शाश्वत शिकवणीचं प्रतीक आहे, जी आपल्याला आचरण आणि विचार शिकवते, असं सांगत मोदींनी आषाढी एकादशीनिमित्तानं शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpur Wariपंढरपूर वारी