शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जय हिंद पापा... शहीद कर्नल सिंग यांना अखेरचा निरोप देताना अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 07:12 IST

चंडीगड : ‘जय हिंद पापा...’ हे शब्द आहेत शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांचा सहा वर्षांचा मुलगा कबीर याचे. सैन्याचा ...

चंडीगड : ‘जय हिंद पापा...’ हे शब्द आहेत शहीद कर्नल मनप्रीत सिंग यांचा सहा वर्षांचा मुलगा कबीर याचे. सैन्याचा गणवेश परिधान करून त्याने वडिलांना अखेरचा निरोप दिला तेव्हा उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला.

दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत बलिदान देणाऱ्या सिंग यांच्यावर पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्नल सिंग यांच्या भरौंजियन गावातील घरी लोकांनी मोठी गर्दी केली होती. कर्नल मनप्रीत यांच्या पत्नी, आई आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हे कुटुंबीय अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. सैन्यातील एक अधिकारी कबीरला मांडीवर घेऊन बसले होते. एका नातेवाईकाने त्यांची दोन वर्षांची मुलगी बन्नी हिला कडेवर घेतले होते.

कर्नल सिंग यांची आई आपल्या मुलाच्या पार्थिवाच्या प्रतीक्षेत घरात दरवाजाजवळ बसली होती. मनप्रीत हे आपल्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे सैनिक होते. त्यांचे वडीलही माजी सैनिक होते आणि त्यांचे ९ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. शहीद मनप्रीत यांच्या पश्चात पत्नी जगमीत कौर, दोन मुले, आई मनजीत कौर आणि भाऊ संदीप असा परिवार आहे. शहिदाची पत्नी हरयाणातील पंचकुला येथील सरकारी शाळेत शिक्षिका आहे. 

मेजर ढोचक यांना निरोप देण्यासाठी उसळली गर्दीजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना आपल्या प्राणांची आहुती देणारे शहीद मेजर आशिष ढोचक यांना त्यांच्या मूळ गावी पानिपत येथे हजारो लोकांनी लष्करी सन्मानाने अंतिम निरोप दिला. त्यांच्या अंत्ययात्रेत शोकाकूल परिवारासोबत लष्कराचे अधिकारीही उपस्थित होते. शहीद मेजर ढोचक यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी पानिपत येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. तेथून त्यांचे पार्थिव लष्कराच्या वाहनातून त्यांच्या मूळ गावी बिंझोल येथे आणण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला शहरातील त्यांच्या घरापासून त्यांच्या मूळ गावी बिंझोलपर्यंत आठ किलोमीटर अंतर कापण्यासाठी सुमारे तीन तासांचा अवधी लागला. कारण मोठ्या संख्येने लोक रस्त्याच्या बाजूला उभे होते. रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने शाळकरी मुले तिरंगा घेऊन उभी होती. मेजर ढोचक यांचे कुटुंब ऑक्टोबरमध्ये पानिपतमधील त्यांच्या नवीन घरात जाणार होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांची मुलगी आणि तीन बहिणी असा परिवार आहे. 

दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत ड्रोनचा वापर जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील डोंगराळ भागातील जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईत ड्रोनचा वापर केला जात आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरू असलेली कारवाई तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPunjabपंजाब